अवैध सावकार बंबचा कारनामा; 2400 ठेव पावत्यांसह सापडले मोठे घबाड

अवैध सावकार आणि एलआयसी एजंट राजेंद्र बंबच्या गैरउद्योगाने घेतले गंभीर वळण
Police action
Police actionSYSTEM
Updated on

धुळे : अवैध सावकार आणि एलआयसी एजंट राजेंद्र बंबच्या गैरउद्योगाने गंभीर वळण घेतले असून पोलिस व सहकार विभागाच्या विशेष पथकाकडून होणाऱ्या रोजच्या लॉकर तपासणीत कोट्यवधींची रोकड, दागदागिने, सौदा पावत्या, खरेदी खत, विदेशी नोटा आणि ठेव पावत्या सापडत आहेत. यात काही पतसंस्थांच्या लॉकरमध्ये तब्बल २४०० ठेव पावत्यांसह कोट्यवधींची रोकड, सोने आढळले आहे. सोमवारपासून ही तपासणी झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डोळे विस्फारतील अशी रोकड, दागदागिने आणि इतर दस्तावेज विशेष पथकाच्या तपासणीत आढळत आहे. पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले, की शहरासह जिल्ह्यातील विविध पतसंस्था, राष्ट्रीयकृत, सहकारी व इतर बँकांशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील अशा वित्तीय संस्थांशीही पत्रव्यवहार केला जाईल. याव्दारे अवैध सावकार बंब याने कुठे- कुठे लॉकर उघडले आहे याची माहिती समोर येईल. त्या दिशेने पहिल्या टप्प्यातील तपास पूर्ण केला जाईल. अटकेतील संशयित बंब सध्या पोलिसांना तपासात सहकार्य करत नसला तरी या गुन्ह्यातील अनेक महत्त्वाचे दस्तावेज आणि लॉकरमध्ये रोकड दडविणे हा गुन्हा त्याने केल्याचे सिद्ध होत आहे. फिर्यादी जयेश दुसाने याच्या वडिलांच्या मालमत्तेची कागदपत्रेही तपासणीतील पतसंस्थेत सापडली आहेत. त्यामुळे आझादनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यासाठी आवश्‍यक पुराव्याची बाजू भक्कम झाली आहे.

Police action
धुळे पोलिसांचा रिक्षाचालकांना दणका; 50 जणांवर कारवाई

हाती लागले घबाड

आर्थिक गुन्हे शाखा, सहकार विभागाच्या विशेष पथकाने योगेश्‍वर पतसंस्थेत अवैध सावकार बंबच्या एकूण सात लॉकरची सोमवारपासून (ता. ६) मंगळवारी (ता. ७) पहाटे साडेतीनपर्यंत तपासणी केली. त्यात दोन कोटी ४७ लाखांची रोकड, तर साडेसहा लाखांवर सोन्याचे दागिने आढळले. या कारवाईत रोकडसह सुमारे चार कोटी ५३ लाखांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात दोन कोटींहून अधिकच्या सुमारे दोन हजार ४०० मुदत ठेवीच्या (फिक्स डिपॉझिट) पावत्या आढळल्या. तसेच या लॉकर्समध्ये २१० खरेदी खत व सौदा पावत्या, पीडितांच्या स्वाक्षरीचे शंभर कोरे धनादेश, सिंगापूर आणि पाच मलेशियाच्या, अशा एकूण सहा विदेशी चलनाच्या नोटा आढळल्या.

ठेव पावत्यांची तपासणी

संशयित बंब याने सावकारी कर्जदारांकडून घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करत सरासरी साडेसात हजार, नऊ हजार, अठरा हजार ते ५० हजारापर्यंतच्या एकूण २४०० मुदत ठेव पावत्या केल्या आहे. या पावत्यांविषयी संबंधित व्यक्तींना काही माहितीही नसेल. यात उदा. स्वप्नील राजेश जाधव यांच्या नावावर प्रत्येकी नऊ हजाराच्या पाच, तर नितीन हरकचंद कासलीवाल यांच्यासह कुटुंब सदस्यांच्या नावे २०१७ पासून नऊ हजाराच्या २१ ठेव पावत्या दिसून आल्या. अशा अनेकांची नावे तपासली जात आहेत. पावत्यांची मुदत संपल्यावर त्याचे नूतनीकरणही संशयित बंब यानेच केल्याचे आढळत आहे. आतापर्यंत शिरपूर पीपल्स बँक, शहादा पीपल्स बँक, जळगाव पीपल्स बँक, योगेश्‍वर पतसंस्था, (कै.) सुनंदाताई केले पतसंस्था, श्रीराम नागरी पतसंस्था, धुळे विकास बँक आदी ठिकाणी मुदत ठेव पावत्या, रोकड, दागदागिने व इतर महत्त्वाचे दस्तावेज सापडले आहेत. ठेव पावत्या प्रकरणी त्या- त्या संस्थेच्या घटकांना चौकशीसाठी बोलाविले जाईल. जप्त डायऱ्यांमधील नावांचीही पडताळणी केली जाणार आहे. कर्जदारांकडून घेतलेले दागिने, कागदपत्रांची तपासणी केली जाईल, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Police action
औरंगाबादच्या नामांतराची घोषणा होणार का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट

आतापर्यंतच्या तपासणीत आढळले काय?

(रोकडसह कंसात दागदागिने रुपयांत)

* १ जून : एक कोटी ३० लाख १ हजार १५०

............... (४६ लाख २२ हजार ३७८)

* २ जून : दोन कोटी ५४ लाख ८८ हजार ५००

............... (१९ लाख ५ हजार १००)

* ३ जून : पाच कोटी १३ लाख ४४ हजार ५३०

............... (५ कोटी ५८ लाख १४ हजार ९११)

* ६ जून : दोन कोटी ४७ लाख, दोन कोटींवर एफडी

............... (६ लाख ५० हजार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com