'येथे' होतेय अवैधरित्या गावठी दारू विक्री 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

 गाव व परिसरात गेली अनेक दिवसांपासून अवैधरित्या गावठी दारू विक्रीचे पेव फुटले असून पोलिसांचे यांकडे दुर्लक्ष होत आहे. मोसम नदीपात्रात तसेच नाल्यावर सर्रासपणे गावठी दारूच्या भट्ट्या संबंधतांकडून लावल्या जात असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे

नाशिक : अंबासन मोसम परिसरात सर्रासपणे अवैद्य गावठी दारू विक्री होत आहे. हे माहित असूनही पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. गावागावात सहज गावठी दारू उपलब्ध होत असल्याने तरूणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे. पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातुन होत आहे. 

पोलिसांचे यांकडे दुर्लक्ष
गाव व परिसरात गेली अनेक दिवसांपासून अवैधरित्या गावठी दारू विक्रीचे पेव फुटले असून पोलिसांचे यांकडे दुर्लक्ष होत आहे. मोसम नदीपात्रात तसेच नाल्यावर सर्रासपणे गावठी दारूच्या भट्ट्या संबंधतांकडून लावल्या जात असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'

बहुतांशी ठिकाणी मिळत असलेल्या गावठी दारूमुळे तरूण मंडळी व्यसनाच्या आहारी जात आहे. अनेकांच  दारूमुळे संसारही उद्ध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. कांही दिवसांपूर्वी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापा टाकून दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. मात्र किराणा दुकानातून गावठी दारूचे साहित्य सहज उपलब्ध होत असल्याने पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी मोसम परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal sales of alcohol in ambasan