Dhule Crime News : अवैध वाळूचा ट्रॅक्टर पकडला; मालक, चालकाविरोधात वाळूचोरीचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Dhule Crime News : अवैध वाळूचा ट्रॅक्टर पकडला; मालक, चालकाविरोधात वाळूचोरीचा गुन्हा दाखल

चिमठाणे : सुलवाडे-जामफळ धरणाच्या जवळ असलेल्या निळ्या पत्र्याच्या शेडजवळ बाभळे फाटा ते सार्वे (ता. शिंदखेडा) रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करताना शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाला सोमवारी (ता. ९) दुपारी साडेचारच्या सुमारास सापडले असता मालक व चालक यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरारी पथक शिंदखेडा तहसील कार्यालयात न नेता पळवून नेला. या प्रकरणी मंगळवारी (ता. १०) शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिंदखेडा तहसीलदार आशा गागुर्डे-संघवी यांनी खलाणे महसूल मंडळ अधिकारी नीलेश सुरेश मोरे, विरदेल महसूल मंडळ अधिकारी एन. एस. माळी, सुकवद तलाठी भीमराव बाविस्कर व शिंदखेडा शहर तलाठी तुषार पवार यांना अवैध गौणखनिजाबाबत कारवाईसाठी पथक नेमणूक करण्यात आले होते. (Illegal sand tractor seized case of sand theft has been registered against owner the driver Jalgaon Crime News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Solapur News: जाधववाडीचे माळरान ते आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटचे मैदान

सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सोंडले गावशिवारात पेट्रोलिंग करीत असताना शिवारातील सुलवाडे-जामफळ धरणाच्या जवळ असलेल्या निळ्या पत्र्याच्या शेडजवळ बाभळे फाटा ते सारवे रस्त्यावर एकजण ट्रॅक्टर ट्रॉली (एमएच १८, एएन १६८६)मध्ये अवैध वाळूची वाहतूक करताना आढळला. त्यास थांबविले असता वाळू वाहतूक करण्याची परवानगी आहे अगर कसे याबाबत त्यास विचारपूस केली असता तो उडावीउडवीची उत्तरे देऊ लागला.

त्या वेळी ट्रॅक्टरमालक प्रेमचंद साहेबराव पाटील (रा. सार्वे) आला व ‘तुम्ही ट्रॅक्टर का थांबविला?’ अशी विचारणा केली. वाळू वाहतूक करण्याच्या परवान्याबाबत विचारले असता कोणताच परवाना नाही म्हणून ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी शिंदखेडा तहसील कार्यालयात सोबत घेऊन येण्यास सांगितले.

ट्रॅक्टरमालक व चालक मागून ट्रॅक्टर घेऊन येत असताना वायपूर ते सार्वे गावादरम्यान त्यांना वाळूची चोरी करण्याच्या उद्देशाने वाळूने भरलेल्या टॉलीसह ट्रॅक्टर तेथून पळवून नेला. मंडळ अधिकारी नीलेश मोरे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून ट्रॅक्टरमालक प्रेमचंद साहेबराव पाटील व ट्रॅक्टरचालक (गाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सदेसिंग चव्हाण तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik Accident News : महामार्गावर शहर गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात