Latest Marathi News | पळासनेरला विदेशी मद्यसाठ्याची अवैध वाहतूक, एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Dhule News : पळासनेरला विदेशी मद्यसाठ्याची अवैध वाहतूक, एकास अटक

शिरपूर : केवळ मध्यप्रदेशात विक्रीची परवानगी असलेल्या विदेशी मद्यसाठ्याची महाराष्ट्रात विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. २३) मुद्देमालासह पकडले.

संशयिताकडून महिंद्रा मॅक्स वाहनासह एकूण तीन लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Illegal transportation of foreign liquor to Palasner one arrested Dhule News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : तपोवन टर्मिनल लवकरचं कार्यान्वित; 50 इलेक्ट्रिक बसेस चार्जिंगची व्यवस्था

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मद्य वाहतुकीवर नजर ठेवली जात आहे. मध्यप्रदेशाकडून महाराष्ट्रात अवैध मद्य वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाल्याने निरीक्षक बी. एस. महाडीक यांना मिळाली. त्यानंतर पळासनेर (ता.शिरपूर) येथे पोलिसांनी सापळा रचला.

२३ डिसेंबरला हॉटेल परमारसमोर संशयित वाहनाला पथकाने थांबवले. महिंद्रा मॅक्स (एमएच १८, टी १९४६) ची तपासणी केली असता ३५ खोक्यांमध्ये विदेशी मद्यसाठाच्या बाटल्या भरल्याचे आढळले. विदेशी मद्यसाठा मध्यप्रदेशनिर्मित असून तिची विक्री केवळ मध्यप्रदेश राज्यात करण्यास परवानगी आहे.

विदेशी मद्यसाठ्याची अवैध वाहतूक करीत असल्याच्या संशयावरुन चालक धर्मेंद्र नवनाथ गिरासे (रा.पळासनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महाडीक यांच्यासह दुय्यम निरीक्षक प्रशांत धाईंजे, सागर चव्हाण, ए. सी. मानकर, एस. एस. गोवेकर, केतन जाधव, प्रशांत बोरसे, मनोज धुळेकर, हेमंत पाटील, शांतिलाल देवरे, रवींद्र देसले यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: Nashik Crime News : चोरीछुप्या हुक्का पार्लर चालविणाऱ्या हॉटेलवर छापा; सापडल मोठ घबाड