जळगाव, नगरमध्ये सर्वाधिक अवैध शस्त्रास्त्रे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नाशिक - गेल्या महिन्यात नाशिक पोलीस परिक्षेत्रातील नगर शहराची कायदा व सुव्यवस्था वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे धोक्‍यात आली होती. या काळात संशयितांच्या हाती गावठी कट्ट्यांपासून धारदार शस्त्रास्त्रे आढळल्याने पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली. यामध्ये परिक्षेत्रातील जळगावात सर्वाधिक, तर त्या खालोखाल नगरमध्ये अवैध शस्त्रास्त्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधून १० पिस्तूल व १९ गावठी कट्ट्यांसह ९३ अवैध हत्यारे हस्तगत केली आहेत.

Web Title: illegal weapon in jalgaon nagar