नाशिककरांनो! आता तत्काळ संपर्क साधू शकता पोलिसांशी..कारण..

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 7 November 2019

अमेरिका, युरोपात नागरिकांच्या सेवेसाठी किओक्‍स सुविधा उपलब्ध आहे. नाशिकस्थित कोडवेल इनोव्हेशन ऍन्ड टेक्‍नॉलॉजी लिमिटेड कंपनीने भारतात नाशिकमध्ये सेवा उपलब्ध करून दिली आहे. सप्टेंबरमध्ये या सेवेचे अनावरण करण्यात आले होते. या सेवेत २४ तास कार्यरत असलेल्या किओक्‍स यंत्रावर लाल रंगाचे बटण असून, आपत्कालीन परिस्थितीत ते बटण दाबल्यास तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला जाऊन मदत मिळण्यास मदत होते. शहरात आणखी १३ ठिकाणी किओक्‍स यंत्रे बसविण्याचे नियोजन असतानाच कोडवेल कंपनीतर्फे यंत्रात आणखी बदल करण्यात आले असून, एकाऐवजी सहा कळ (बटण) निर्माण करण्यात आले आहेत

नाशिक : पोलिस व नागरिकांचा मित्र बनलेल्या व आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी तत्काळ संपर्क साधून विशेषतः महिलांना सुरक्षिततेचे कवच परिधान केलेल्या किओक्‍स यंत्राच्या व्याप्तीत आणखी वाढ होणार आहे. यापूर्वी आपत्कालीन परिस्थितीत फक्त पोलिसांशी संपर्क साधला जात होता. आता पोलिसांसह महापालिका, मेडिकल, मीडियासाठी स्वतंत्र "कळ' यंत्रणांमध्ये निर्माण करण्यात आली असून, लवकरच ही सेवा नाशिककरांच्या स्वाधीन केली जाईल. 

पोलिसांसह महापालिका, अन्य सहा विभागांशी तत्काळ संपर्क 
अमेरिका, युरोपात नागरिकांच्या सेवेसाठी किओक्‍स सुविधा उपलब्ध आहे. नाशिकस्थित कोडवेल इनोव्हेशन ऍन्ड टेक्‍नॉलॉजी लिमिटेड कंपनीने भारतात नाशिकमध्ये सेवा उपलब्ध करून दिली आहे. सप्टेंबरमध्ये या सेवेचे अनावरण करण्यात आले होते. या सेवेत २४ तास कार्यरत असलेल्या किओक्‍स यंत्रावर लाल रंगाचे बटण असून, आपत्कालीन परिस्थितीत ते बटण दाबल्यास तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला जाऊन मदत मिळण्यास मदत होते. शहरात आणखी १३ ठिकाणी किओक्‍स यंत्रे बसविण्याचे नियोजन असतानाच कोडवेल कंपनीतर्फे यंत्रात आणखी बदल करण्यात आले असून, एकाऐवजी सहा कळ (बटण) निर्माण करण्यात आले आहेत. पोलिस, महापालिका, मेडिकल, शेल्टर होम, अग्निशमन दल, मीडियासाठी स्वतंत्र बटण निर्माण करण्यात आले आहे. पोलिसांची तत्काळ मदत हवी असल्याने त्या प्रकारचे बटण दाबल्यास पोलिस नियंत्रण कक्षाशी तत्काळ संपर्क होईल. महापालिकेसंदर्भात तक्रार किंवा अन्य माहिती हवी असल्यास त्या प्रकारचे बटण दाबल्यानंतर महापालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला जाईल. अशाच प्रकारची सोय अन्य विभागांसंदर्भात या नवीन तंत्रज्ञानात देण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांतर्फे लवकरच या यंत्रांचे लोकार्पण होईल. 
 
सुरक्षित "किओक्‍स'च्या व्याप्तीत वाढ; देशात नाशिकमध्ये सेवा 
अमेरिका, युरोपातील ३८ देशांत किओक्‍स सेवा पुरविली जाते. कोडवेल इनोव्हेशन ऍन्ड टेक्‍नॉलॉजी कंपनीने या यंत्राचे पेटंट घेतले आहे. नाशिकस्थित कंपनी असल्याने नाशिककरांना पहिली सेवा देण्याच्या उद्देशाने सप्टेंबरमध्ये किओक्‍स यंत्र बसविले होते. आता त्यात नवीन फीचर बसविले असून, त्याचे लोकार्पण लवकरच होणार आहे, अशी माहिती कंपनीच्या बिझनेस, रिलेशन मॅनेजर सना पठाण यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediate contact with the municipality and other departments with police due to the kiosks Nashik News