चोरट्याने केला तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न

suicide
suicide

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळुन गालेल्या दुचाकी चोराला पकडल्यानंतर त्याने मंगळवारी (ता.२०) आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यातील लॉकअप मधे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या गळ्याला  जखम झाल्याने त्याला उपचारासाठी  नांदेडे येथे हलविण्यात आले आहे. 

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देगलूर (जि.नांदेड) येथील देविदास कांबळे (वय३०) याला अटक करून आखाडा बाळापूर पोलिसांच्या हवाली केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला रविवारी (ता.१८) सेनगावच्या न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर रात्री परत आखाडा बाळापूर येथे आणत असतांना कळमनुरीजवळ माळेगाव फाटा येथून त्याने पोलिस वाहनातून उडी मारून पलायन केले. त्यानंतर दहा तास कोंम्बींग ऑपरेशन केल्यानंतर सोमवारी (ता.१९) दुपारी तो एका शेतात लपलेला आढळून आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.  

दरम्यान, त्याला आखाडा बाळापूर येथील  लॉकअपमधे ठेवण्यात आले होते. या ठिकाणी त्याने आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  गळ्यावर फरशी मारून घेतली. त्यानंतर अंगावर पांघरून घेतले. यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्याला पांघरून काढण्यास भाग पाडल्यानंतर गळ्यातून रक्त येत असल्याचे आढळून  आले. पोलिसांनी  त्याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. या प्रकारामुळे आखाडा बाळापूर पोलिस पुन्हा अडचणीत सापडलेआहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com