धुळ्यात माणुसकीचे धान्य कोठार

धुळ्यात माणुसकीचे धान्य कोठार

धुळे : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी, लॉकडाउन (Lockdown) लागू केलेले आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील शेकडो कुटुंबांचे हातावर पोट असल्याने चूल पेटू शकत नाही. अशा पीडित कुटुंबांना अन्नाचे दोन घास मिळावेत, या उद्देशाने माणुसकीचे धान्य कोठार ही संकल्पना पुरोगामी प्रतिष्ठानने (pratishatan foundation) अमलात आणल्याची माहिती अध्यक्ष महेंद्र शिरसाट यांनी दिली. (In dhule, the pratishatan foundation is distributing foodgrains to needy families)

धुळ्यात माणुसकीचे धान्य कोठार
तापीचे बॅक वॉटर फुलविणार सहा हजार हेक्टरवरील शेती

ते म्हणाले, की शहरातील गरजवंत कुटुंबीयांची घरे शोधून काढली आहेत. त्यांच्या घरी पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ आणि काही आवश्यक वस्तू पुरवण्याचा संकल्प आहे. तो दानशूरांशिवाय, माणुसकी जोपासणाऱ्या व्यक्तींच्या मदतीशिवाय तडीस जाणे शक्य नाही. त्यामुळे दानशूरांनी गरजेच्या वस्तू किंवा आर्थिक मदतीतून या बांधिलकीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर माणुसकीचे धान्य कोठार या उपक्रमाचे नाटककार प्रा. अनिल सोनार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

धुळ्यात माणुसकीचे धान्य कोठार
धुळ्यातील ८३ गावे जल जीवन मिशनमध्ये

पुरोगामी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांनी मार्गदर्शन केले. संस्थापक अध्यक्ष श्री. शिरसाट यांनी माणुसकीचे धान्य कोठार ही संकल्पना कशी राबवता येईल यासह नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. युवा उद्योजक वर्धमान संघवी, सुकलाल बोरसे, राजन शिरसाठ, गणेश चौधरी, जितू पाटील, छाया सोमवंशी, संजिवनी गांगुर्डे, शोभा आखाडे, सुषमा महाले आदी उपस्थित होते. इच्छुकांनी मदतीसाठी ७९७२२ ०८८२९ या मोबाईल क्रमांकासह व्ही. के. मार्केट, पाच कंदिल व महेंद्र शिरसाठ यांचा पुरोगामी वाडा, दैठणकर नगर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे या पत्त्यावर संपर्क साधावा.

(In dhule, the pratishatan foundation is distributing foodgrains to needy families)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com