Dhule Agriculture News : कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला; मजुरी वाढल्याने शेतकऱ्याच्या खिशाला अधिक झळ

पिकांना पाणी पुरेल की नाही ही चिंता असतानाच शेत मजुरांची मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.
Farm laborer while planting onion in the field.
Farm laborer while planting onion in the field.esakal

Dhule Agriculture News : यंदा पाऊस कमी झाल्याने परिणामी, विहिरींमध्ये पाणी पातळी कमी झाली आहे.

पिकांना पाणी पुरेल की नाही ही चिंता असतानाच शेत मजुरांची मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.(increase in wages of farm laborers has again added to worries of farmers dhule agriculture news)

यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला आहे. परिसरातील बल्हाणे, शेवगे, विरखेल, वंजारतांडा, वार्सा, उंभरपाटा सह पश्चिम पट्ट्यातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहे.

पाण्याअभावी येथील पिके कशी जगवावी असा प्रश्न असतानाच उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरीही पाण्याच्या गंभीर स्थितीपुढे नमला असताना १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण व पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे कांद्याची रोपे खराब झाली आहेत. त्यामुळे कांदा लागवडही आठवड्यांपासून धिम्या गतीने सुरू आहे.

साक्री तालुक्यात विहिरींमध्ये पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागल्याने कांदा रोपालाही मागणी उरली नाही. यात पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे ती कांदा लागवड करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत झालेली वाढ. शेतमजुरांच्या मजुरीत ५० रुपयांची वाढ होऊन ती अडीचशे रुपयांवरून तीनशे रुपयांवर पोचली आहे. या मजुरी वाढीचा चांगलाच फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

वातावरण बदल, अवकाळी पाऊस, कमी उत्पादन, कांद्याची सड अशा विविध संकटातून वाचवून आणलेला उन्हाळी कांदा अजूनही काही शेतकऱ्यांचा चाळीतच पडला आहे. वरुण केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीचे धोरणाचा परिणाम म्हणून बाजारपेठांमध्ये नव्या व जुन्या कांद्याचे दर निम्म्यापेक्षा अधिक खाली घसरले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला आहे.

Farm laborer while planting onion in the field.
Dhule Agriculture News : कोथिंबीर 150 रुपये प्रतिकिलो...! पितृपक्षामुळे किरकोळ विक्रीचे भाव कडाडले

वाहतुकीचा अतिरिक्त खर्च

पिंपळनेर परिसरात शेतमजूर बाहेरील खेड्यापाड्यातून आणावी लागत आहेत. यासाठी शेतमजुरांना त्यांच्या गावापासून तर शेतापर्यंत वाहनाने न्यावे लागते व परत सायंकाळी पोचवावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त १२०० ते १५०० रुपये वाहनाचे भाडे खर्च करावे लागते. वरुण शेतमजुरांना वाढीव मजुरी द्यावी लागत आहे.

कांदा लागवडीसाठी प्रतिएकर ४० ते ४५ मजूर आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना मजुरीपोटी जवळपास १३ हजार रुपये खर्च लागतो. १७०० ते १८०० रुपये प्रति गोणी किमतीच्या प्रति एकर दोन गोण्या रासायनिक खते लागवडीवेळी शेतात टाकावे लागते. प्रति एकर एवढे भांडवल खर्च करणे शेतकऱ्यांना परवडेनासे असली तरी नाइलाजास्तव करावे लागत आहे.

''कांदा लागवड सुरू केली पण निसर्गाची साथ नाही एकरी कांदा लागवड साठी पंधरा हजार रुपये खर्च असून खताचे भाव दुपटीने वाढलेले आहेत. वातावरणामुळे होणाऱ्या बदलामुळे पुढील खर्चाच्या दुपटीने खतांचा आणि औषधांचा खर्च मिळून एकरी खर्च ६५ हजारच्या पुढे जात आहे. सर्व खर्च करून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडू शकते हे सांगता येणार नाही.''- गंगाधर शिंदे, कांदा उत्पादक शेतकरी देश-शिरवाडे

Farm laborer while planting onion in the field.
Dhule Agriculture News : उत्पादन घटूनही धुळ्यात सोयाबीन अल्पदरात; शेतकरी आर्थिक अडचणीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com