खून प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग धोक्याचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

इंदिरानगर/नाशिक - आजच्या स्पर्धा व धावपळीच्या युगात आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडत असल्याने मुलांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळच नाही. त्यामुळेच लहान मुलांवर कुणाच वचक, धाक राहिलेला नाही. अशी मुले बेफाम झाली असून, मारामारीनंतर आता खून करण्यात, खुनाच्या कटात सामील होण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे दिसते. पाथर्डी गावात मंगळवारी (ता. 19) रात्री झालेल्या रितेश पाईकराव (वय 19) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी 12 तासांच्या आत अटक केलेल्या सातपैकी चार अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. हा सहभाग म्हणजे पालक व समाजासाठी धोक्‍याची घंटाच म्हणता येईल. 

इंदिरानगर/नाशिक - आजच्या स्पर्धा व धावपळीच्या युगात आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडत असल्याने मुलांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळच नाही. त्यामुळेच लहान मुलांवर कुणाच वचक, धाक राहिलेला नाही. अशी मुले बेफाम झाली असून, मारामारीनंतर आता खून करण्यात, खुनाच्या कटात सामील होण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे दिसते. पाथर्डी गावात मंगळवारी (ता. 19) रात्री झालेल्या रितेश पाईकराव (वय 19) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी 12 तासांच्या आत अटक केलेल्या सातपैकी चार अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. हा सहभाग म्हणजे पालक व समाजासाठी धोक्‍याची घंटाच म्हणता येईल. 

धमाल, मौजमजा, मस्ती करण्याचे वय असताना आता मुले गुन्हेगारीकडे वळू लागली असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला शाळा तसेच मित्र-मैत्रिणींची साथसंगत जबाबदार असल्याचे निरीक्षणातून दिसते. मंगळवारची घटनाही साध्या खेळण्यावरून झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवला आणि खून केला. याचा अर्थ आता अल्पवयीन मुलांना रागही नियंत्रणात ठेवणे अवघड झाले आहे. याला कारण आई-वडिलांचे अति लाडही जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेले शाळकरी विद्यार्थी आहेत. त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. विशेष म्हणजे, यातील प्रमुख हल्लेखोर हा अल्पवयीनच आहे. यापैकी कुणावरही, कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याने परिसरासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. 

जुन्या खेळण्याच्या भांडणाचा वचपा  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2018 मध्ये रितेशने या अल्पवयीन मुलांना घराजवळ खेळू नका, असे सांगितले, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांच्याशी भांडण करत त्यांना मारले. या कारणावरून त्या वेळी त्यांच्या विरोधात इंदिरानगर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर रितेशला काही दिवस गावी पाठविण्यात आले. पण चार महिन्यांपूर्वी तो परत आल्यानंतर अंबड येथे कंपनीत कामाला जाऊ लागला. मंगळवारी (ता. 19) रात्री तो न आल्याने वडील अनिल पाईकराव आणि मेहुणे सुरेश गायकवाड त्याला शोधण्यासाठी गेले असता, दाढेगाव रस्त्यावर हातात तलवार घेऊन मुख्य अल्पवयीन संशयित, तर चाकू घेऊन दुसरा अल्पवयीन संशयित, तसेच नयन सुरेश शिंदे (वय 18), नरेश नाना दोंदे (18) व उमेश कोंडीराम आव्हाड (वय 19, रा. सुकदेवनगर, पाथर्डी) व अजून दोघा अल्पवयीन मुलांसह रितेशला मारत होते. आरडाओरड झाल्याने ते सर्वजण पळाले. मात्र, दिव्यांच्या उजेडात या सर्वांना बघितल्याचे फिर्यादी सांगतात. घरच्याच रिक्षात पोटात, डोक्‍याला आणि हाताला गंभीर दुखापत झालेल्या रितेशला कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने रात्रीच संशयितांच्या तपासास सुरवात केली. अवघ्या 12 तासांत नाशिक शहर व परिसरातून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले. शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. एन. मोहिते, उपनिरीक्षक रोहित शिंदे, अजिनाथ मोरे, सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रेय पाळदे यांच्यासह हवालदार राजेश निकम, रमेश टोपले, संदीप लांडे व भगवान शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे. 

गुन्ह्यात कुठलीही नोंद नसलेल्या अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. पालकांनी आपल्या पाल्यावर नेहमी लक्ष ठेवायला पाहिजे. किमान आपली मुले दिवसभर कुठे जातात, कधी येतात, काय करतात?, या दिवसभरातील घडामोडींची माहिती ठेवावी. मुलांचे मित्र-मैत्रिणींबाबतही दक्ष राहायला हवे. या प्रकारांना घरातूनच आळा घालता येणे शक्‍य होईल. 
- नारायण न्याहळदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Web Title: Increasing participation in the murder case of hazardous minor children