निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरात अनेक संस्थांचे तिरंग्याला वंदन

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जैताणे ग्रामपंचायतीत सरपंच संजय खैरनार आणि निजामपूर ग्रामपंचायतीत सरपंच साधना राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, उपसरपंच आबा भलकारे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, इतर शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरासह निजामपूर-जैताणेत येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोगते, देशभक्तीपर गीते, पथसंचलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. जैताणे ग्रामपंचायतीत सरपंच संजय खैरनार आणि निजामपूर ग्रामपंचायतीत सरपंच साधना राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, उपसरपंच आबा भलकारे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, इतर शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

आझाद चौकात माजी जिल्हा परिषद सदस्य चंदूलाल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ग्रामविकास अधिकारी पी. बी. मोराणे, उपसरपंच अनिता मोहने, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक जयंत भामरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संचालक मंडळाचे सर्व सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. धनाई-पुनाई विधायक मंडळ संचलित इंदिरा गांधी माध्यमिक कन्या विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते सीताराम वाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 

सर्व संचालक मंडळ सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विद्या विकास मंडळ संचलित रामरावदादा पाटील आश्रमशाळेत भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. शरदचंद्र शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्याध्यापक, अधीक्षक, अधिक्षिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. निजामपूर पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, कौतिक सुरवाडे आदींसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जवाहरलाल वाचनालयात डॉ. हेमंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. माजी सरपंच अजितचंद्र शाह, वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, उपाध्यक्ष कमलेश शाह, सचिव नितीन शाह आदींसह संचालक मंडळ, कर्मचारीवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित भानुबेन वाणी पब्लिक स्कुलमध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रमोदचंद्र शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपाध्यक्ष बाबूलाल वाणी, सचिव लक्ष्मीकांत शाह, सर्व संचालक मंडळ सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद पतसंस्थेत संचालिका जयश्री शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पतसंस्थेचे अध्यक्ष अजितचंद्र शाह, उपाध्यक्ष बापू महाले आदींसह संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते. खुडाणे ग्रामपंचायतीत शेतकरी देविदास शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सरपंच कल्पना गवळे, उपसरपंच नामदेव गवळे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. खुडाणे येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत डॉ. प्रकाश गवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्याध्यापिका कल्पना सावंत यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Independence day at nijampur jaitane malmatha area