नांदगावला भारिप बहुजन महासंघाच्यावतीने घंटानाद 

संजीव निकम
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नांदगाव : विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने घंटानाद कोरेगाव भीमा प्रकरणी दंगलीचे प्रमुख सूत्रधार संभाजी भिडेंना अटक करावी, या व इतर प्रमुख मागण्यासाठी आज येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाबाहेर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज दुपारी घंटानाद करण्यात आला.

तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, कादिर शेख, यशवंत बागुल, राज पवार, अविनाश केदारे, प्रशांत पवार, अन्वर मन्सुरी, उमेश भालेराव, शकील शेख यांच्या नेतृतखाली भारिप बहुजन महासंघ घंटानाद करणार म्हणून यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

घोषणा देत आलेल्या भारिप बहुजन कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वाराबाहेर अटकाव केला. प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांनी कार्यालयाबाहेर येऊन आंदोलनकर्त्यांचे निवदेन स्वीकारले. निवेदनात दंगलीतल्या बौद्धांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, ओबीसी व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी एससी एस टी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती देण्यात यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, मनमाड नांदगावचा पाणी प्रश्न सोडवावा विभक्त व नवीन शिधापत्रिकाबाबत दाखल प्रकरणे प्रलंबित न ठेवता निर्णय घेऊन निकाली काढावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

Web Title: indian republic party organised ghantanad agitation at nandgao