SAKAL Impact: इमारतीच्या बांधकामाची कार्यकारी अभियंत्यांकडून पाहणी; मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न

Engineers Mukesh Thakur, Shivaji Patil etc. while inspecting the unfinished works in the last phase of building of Primary Health Centre.
Engineers Mukesh Thakur, Shivaji Patil etc. while inspecting the unfinished works in the last phase of building of Primary Health Centre.esakal

SAKAL Impact : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम किरकोळ कामाअभावी सहा महिन्यांपासून बंद पडले आहे. त्यामुळे रुग्णांना छताखाली उपचार घ्यावा लागतो आहे.

बंद पडलेल्या इमारतीच्या कामाची नुकतीच प्रत्यक्ष पाहणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर यांनी केली. लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. (Inspection of building construction by Executive Engineers Question of Malpur Primary Health Centre Dhule SAKAL Impact)

‘इमारतीअभावी वैद्यकीय सेवा छताखाली’ (सकाळ ः १५ जुलै) वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची तातडीने दुसऱ्या आठवड्यातच कार्यकारी अभियंता ठाकूर यांनी थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन पाहणी केली.

गेल्या दीड वर्षापासून इमारतीअभावी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात रुग्णांवर औषधोपचार केला जातो. रात्रंदिवस आरोग्यसेवा असणारी सेवा फक्त दिवसाच दिली जाते. प्रसूती सेवा, कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत खंड पडला आहे.

गरजू महिला रुग्णांना बाहेर इतत्र जावे लागते. त्यामुळे नाराजी व्यक्त करत रुग्ण खंत व्यक्त करतात. राष्ट्रीय कामकाजाचे लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर उर्वरित इमारतीचे किरकोळ काम पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.

मालपूर पंधरा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. परिसरातील सुराय, चुडाणे तर शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेले अक्कलकोस, कलवाडे आदी गावांतील गोरगरीब रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही.

रात्री, पहाटे अचानक काही झाल्यास खासगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागतो. त्यामुळे गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जलजन्य, कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढू शकतात.

सोयी-सुविधांयुक्त इमारतीअभावी साथरोग नियंत्रण कक्षाची निर्मिती आरोग्य यंत्रणेला उभारता येऊ शकत नाही. आंतररुग्ण विभागातही रुग्णांना भरती करता येऊ शकत नाही. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Engineers Mukesh Thakur, Shivaji Patil etc. while inspecting the unfinished works in the last phase of building of Primary Health Centre.
Nashik Rain Update: बोरखिंड, कोनांबे धरण ओव्हरफ्लो! शेतकरी सुखावला

यंत्रणांकडून दुर्लक्ष?

जिल्हा परिषदेचे शिक्षण, आरोग्य समितीचे सभापती महावीरसिंह रावल यांचे स्वत:चे गाव आहे. त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले; परंतु सहा महिने आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या शेवटच्या टप्प्यातील कामात प्रगती दिसून आली नाही.

त्यांच्या संयमी, शांत स्वभावाचा फायदा संबंधित यंत्रणा घेत आहेत की काय, असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. सत्तेची सूत्रे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर थेट राज्य, देशपातळीपर्यंत श्री. रावल यांच्या पक्षाकडे आहेत.

सत्ता नसणाऱ्या ठिकाणी काय परिस्थिती असू शकते याबाबत न विचार केलेला बरा, अशीही चर्चा यानिमित्ताने केली जात आहे. आता बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकूर यांच्या पाहणीनंतर किती दिवसांनी कामाला सुरवात होते याकडे लक्ष लागून आहे.

Engineers Mukesh Thakur, Shivaji Patil etc. while inspecting the unfinished works in the last phase of building of Primary Health Centre.
Dhule Labor Shortage: शेती करावी की नको? न्याहळोदसह परिसरात मजुरांची टंचाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com