दारुबंदीसाठी ग्रामीण भागात महिलेचे 'अहिराणी'तून प्रबोधन  

दगाजी देवरे
मंगळवार, 15 मे 2018

धुळे (म्हसदी) - व्यसनाचा सर्वाधिक त्रास महिलांनाच होतो. व्यसनामुळे अनेकाचे संसार उध्वस्त झाले आहेत. व्यसनापासून लांब रहा, गांवात दारुबंदी करा असे आवाहन काल(ता.11)सायंकाळी येथील
 बसस्थानकावर एक महिला अहिराणी भाषेत करत होती.

धुळे (म्हसदी) - व्यसनाचा सर्वाधिक त्रास महिलांनाच होतो. व्यसनामुळे अनेकाचे संसार उध्वस्त झाले आहेत. व्यसनापासून लांब रहा, गांवात दारुबंदी करा असे आवाहन काल(ता.11)सायंकाळी येथील
 बसस्थानकावर एक महिला अहिराणी भाषेत करत होती.

ना व्यासपीठ ना ध्वनीक्षेप, थेट अहिराणी भाषेत दारु पिऊ नका..दारुच्या 
दुष्परिणामांविषयी दारुबंदी मोर्चाच्या अध्यक्षा गितांजली कोळी जनजागृती करत होत्या. जिल्ह्यातील त्यांचा हा एकतीसवा प्रबोधनाचा कार्यक्रम होता. दोन वर्षापासून ते व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करत आहेत. राज्यात दारुबंदी व्हावी म्हणून आमदार, खासदार, जिल्हाधिकारीपासून थेट मुख्यमंत्र्यांना भेटून दारुबंदीची मागणी श्रीमती कोळी यांनी केली आहे.

धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष हिम्मतराव देवरे, पोलीस पाटील पोपटराव देवरे, प्रभाकर सावंत, संगीता सैदांणे, विनायक देवरे, दिलीप देवरे, आर.जी.देवरे, किर्तनकार सतीलाल महाराज, डॉ.आबा वाणी, उत्तम मोहिते, शरद भदाणे, रमजान पिजांरी, सुरेश जैन, मधुकर देवरे, प्रदिप जोशी,डॉ.अशोक बावीस्कर यावेळी उपस्थित होते.

निवडणुक असो वा लग्न....!
दरम्यान, अलिकडे तरुण पिढी व्यसनामुळे वाया जात असल्याची खंतही श्रीमती कोळी यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून लग्न सोहळा असो वा निवडणुकीचा फड दारुचा सर्रास वापर होत असल्याचे वास्तव आहे. क्षणिक सुखाच्या पाठीमागे तरुण पिढी लागल्याचे चित्र आहे. श्रीमती कोळी जिल्हाभरात दारुबंदीसाठी गावोगावी जाऊन जनजागृती करत आहेत. चौकात थांबून ग्रामस्थांना एकत्र करत व्यसनाचे दुष्परिणाम समजतील अशा अहिराणी भाषेत सांगत आहेत. प्रत्येक आई-वडिलांना आपले पाल्य शिकून मार्गी लागावे अशी अपेक्षा असते. दुसरीकडे राजकीय पदाधिकारी वा स्वतःला नेते समजणारे मात्र निवडणुकी पुरता तरुणाईचा वापर करत असल्याची वास्तवता त्या मांडतात. अनेक गावात दारुंबदी झाली आहे. मग आपले गांव मागे का..? हा विचार का केला जात नाही. त्यासाठी महिलांनी पुढे यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्यसनाचा वाईट अनुभव स्वतःच्या कुटुंबापासून आला. संसाराची यातून होणारी वाताहत थांबण्यासाठी हे काम हाती घेतले आहे. ब्युटी पार्लरचा व्यवसाय असल्याने महिलांच्या वेदना जवळून जाणल्या म्हणून गावोगावी जात जनजागृती करत आहे.
सौ.गितांजली कोळी, धुळे.

Web Title: Inspiration from women's 'Ahirani' in rural areas for alcoholism