गुंतवणुकीच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नाशिक - देवपूर शिवारातील (ता. सिन्नर) प्लॉट खरेदीसाठी आर्थिक गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर, भंडारा येथील पाच संशयितांनी गोविंदनगर परिसरात इस्टेट कंपनीचे कार्यालय सुरू करून त्यामाध्यमातून सदरची आर्थिक फसवणूक केली आहे. शिवाजी राजाराम पाटील (रा. प्रथम दर्शन सोसायटी, सिद्धेश्‍वरनगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित जितेश नशिने, अहमद ए. जिवानी, विजय गौतम (तिघे रा. नागपूर), मोतीलाल तुकाराम भांडेबुचे (रा. विनोबानगर, तुमसर, जि. भंडारा) व सचिन नाफडे अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी गोविंदनगर येथील प्रकाश पेट्रोल पंपाजवळ असलेल्या चंद्रकिरण पार्कमध्ये फिनिक्‍स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल या नावाने आर्थिक गुंतवणुकीसंदर्भातील कार्यालय सुरू केले होते.
Web Title: Investment Cheating Crime