जेल रोडला महिलेचे फाडले कापडे

Crime
Crime

नाशिक - जेल रोड परिसरातील पंचक येथे दारापुढे कार उभी न करण्याचे सांगण्यास गेलेल्या महिलेला जातिवाचक शिवीगाळ करीत तिच्या अंगावरील कपडे फाडत बेदम मारहाण केली. महिलेने नाशिक रोड पोलिसांत धाव घेतली असता, दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी उलट तिलाच दमदाटी करीत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून पिटाळून लावले. अखेर उपायुक्त अमोल तांबे यांच्याकडे दाद मागितल्यावर नाशिक रोड पोलिसांनी ॲट्रॉसिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

नंदू दगडू सानप (रा. जागृतीनगर, पंचक, जेल रोड) असे संशयिताचे नाव असून, तो शिक्षक आहे. महिलेच्या तक्रारीनुसार संशयित सानप शेजारी राहतात. सानप हा त्याची कार नेहमी या महिलेच्या दारासमोर उभी करतो. त्यामुळे त्यांना वापर करण्यासाठी रस्ता राहत नसल्याने त्या संशयिताला बुधवारी (ता. ३) सकाळी कार दारासमोर उभी न करण्यास सांगण्यास गेली असता, नंदू सानप याने पीडित महिलेच्या मुस्काटात मारून जातिवाचक शिवीगाळ केली. त्या वेळी संशयित व त्याची पत्नी मंगल ऊर्फ प्रतिभा नंदू सानप या दोघांनी तिच्या अंगावरील कपडे फाडले. 

त्यामुळे अर्धनग्न अवस्थेतील त्या महिलेने आपली अब्रू वाचविण्यासाठी आडोशासाठी पळ काढला. संशयितांनी तिचा पाठलाग करीत मारहाण केली. 
तिच्या बचावासाठी मुलगा आला असता, त्यासही बेदम मारहाण केली. या वेळी आसपासचे काही नागरिक बचावासाठी धावले असता, सानपने आपण विद्यमान आमदाराचे नातलग असून, आपले राजकीय वजन असल्याचे सांगत मधे न पडण्याची धमकी दिली.

उपायुक्तांकडून दखल
शेवटी मायलेकांनी थेट पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांची भेट घेत आपबिती विशद केली. या वेळी पीडित महिलेने भररस्त्यावर कपडे फाडल्याच्या प्रसंगाचे धाय मोकळून रडत घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी तत्काळ नाशिक रोडचे पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्याशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य न घेतल्याबद्दल सुनावले आणि तत्काळ गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नाशिक रोड पोलिसांत ॲट्रॉसिटी, विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com