Jalgaon Airport
sakal
जळगाव: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर प्रवाशांची उल्लेखनीय वाढ झाली असून, केवळ ११ दिवसांत ५ हजाराच्यावर प्रवाशांनी हवाईसफर केली आहे. स्थानिक तसेच बाहेरील प्रवाशांनी या कालावधीत विविध मार्गांवर प्रवास करत जळगाव विमानतळाच्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवला आहे. येथील विमानतळाहून सध्या पुणे, मुंबई, हैदराबाद, गोवा व अहमदाबाद येथे विमानसेवा सुरू आहे.