चाळीसगावच्या विद्यार्थ्याची जगण्यासाठी धडपड!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

जळगावः बेलगंगा (ता. चाळीसगाव) येथील विद्यार्थी पवन वाल्मिक पाटील याला कर्करोगाने ग्रासले असून, जगण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असून, त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

पवन हा सध्या बी.एससीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. अचानक झालेल्या या आजारपणामुळे परिवारासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. धुळे येथील डॉक्टरांनी त्याला तत्काळ मुंबईला दाखल करायला सांगितले आहे. पवन सध्या प्रचंड वेदनेमुळे त्रस्त आहे.

पवनचे वडील शाळेत शिपाई म्हणून काम करत आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बेलगंगा येथील वसाहतीतील नागरिकांनी पुढे येऊन आर्थिक मदत गोळा केली आहे. परंतु, उपचारासाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता आहे. यामुळे दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन कुटुंबियाच्या वतीने करण्यात आले आहे.

आर्थिक मदत पाठवण्यासाठी:
Dhananjay Walmik Patil
A/c: 18020100009072
IFSC Code: BARB0DEOJAL
MICR Code: 425012514
Bank of Baroda, Deoli branch

Web Title: jalgaon cancer student need hospital help