जळगाव मतदारसंघात महाजनांची प्रतिष्ठा पणाला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची शनिवारी (ता.19) निवडणूक होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने मतदान केंद्रे जाहीर केली आहेत.

जिल्ह्यात आठ केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चारदरम्यान मतदान होईल. निकाल 22 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने प्रथमच खडसे यांच्या मर्जीतील उमेदवाराला डावलून जलसंपदामंत्री गिरीश महाजन समर्थक उमेदवाराला संधी दिल्यामुळे महाजन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

असे आहेत उमेदवार
चंदूलाल विश्राम पटेल (भाजप), शेख जावेद इक्‍बाल अ. रशीद (अपक्ष), सुरेश रूपचंद देवरे (अपक्ष), प्रशांत अरविंद पाटील (अपक्ष), शाम अशोक भोसले (अपक्ष), ऍड. विजय पाटील (अपक्ष), शेख अखलाक शेख युसूफ (अपक्ष), नितीन दत्तात्रय सोनार (अपक्ष).

मतमोजणी मंगळवारी
मतमोजणी मंगळवारी (ता.22) सकाळी आठपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरवात होणार आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रुबल अग्रवाल, सहायक निवडणूक अधिकारी राहुल मुंडके निकाल जाहीर करतील.

Web Title: Jalgaon constituency Mahajan reputation at stake