Eknath Khadse
sakal
जळगाव: कोरोना काळात शासकीय यंत्रणेद्वारे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या व सध्या धूळखात असलेल्या ऑक्सिजन प्लांटचा ‘सकाळ’ने प्रभावीपणे लावून धरलेला विषय शुक्रवारी (ता.१२) विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला. आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत ‘सकाळ’चे या वृत्तासंबंधी विशेष पान सभागृहात दाखवून या बंद पडलेल्या प्लांटची चौकशी करावी, अशी मागणी करीत सरकारला धारेवर धरत यासंदर्भात खडसेंनी विधान परिषदेत ‘लक्ष्यवेधी’ मांडली..