Jalgaon Exposes Call Center Scam
sakal
जळगाव: ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाउसवर जळगाव पोलिसांनी छापा टाकून माजी महापौर ललित कोल्हे याच्यासह आठ संशयितांना अटक केली. त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाधिकारी उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी संशयितांकडून चालविल्या जाणाऱ्या कॉल सेंटरमधून विदेशी नागरिकांना संपर्क करून त्यांची ऑनलाइन लूट करण्यात येत असल्याने संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार असल्याचे युक्तिवादातून मांडले.