जळगाव: कुठल्याही विवाहित स्त्रीला स्वतःचा संसार मोडावा, असे कधीच वाटत नाही. मात्र, लग्नानंतर नव्या कुटुंबीयांशी जुळवून घेण्यास तिला किमान दहा वर्षे लागतात. याच नाजूक वेळेत तिच्या गोंधळलेल्या मनस्थितीचा गैरफायदा घेत वेगळे काढण्यासाठी काहींचा खटाटोप सुरू असतो.