gambling raid
sakal
जळगाव: पाळधी (ता. धरणगाव) येथे सोमवारी (ता. ८) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगारअड्ड्यावर अचानक छापा टाकून १६ जुगारींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.