काय सांगता...या शाळेत लाटले गेले विद्यार्थ्यांचे लाखो रूपये

r r vidhyalay jalgaon
r r vidhyalay jalgaon

जळगाव : शहरातील आर. आर. विद्यालयातील अठराशे विद्यार्थ्यांकडून वसूल केलेल्या 16 लाख 81 हजार 400 रुपयांची रक्कम शाळेच्या बॅंक खात्यात न भरता परस्पर गैर व्यवहार केल्याची तक्रार मुख्याध्यापक विजय रोकडे यांनी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय सखाराम रोकडे (वय 43) यांच्या तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे, संशयित दगडू सुदाम सरोदे, विजया कैलासचंद्र काबरा, भरत रघुनाथ बसेर आणि निर्मला गणेश पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून त्यात नमूद केल्याप्रमाणे संशयितांनी शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या 532 विद्यार्थ्यांकडून प्रत्येक दीड हजार प्रमाणे 7 लाख 98 हजार रुपये तसेच नवीन प्रवेशीत व मागील वर्षापासून शिक्षण घेत असलेल्या 532 विद्यार्थी असे एकूण 2 हजार 948 विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या प्रत्येकी 300 रुपया प्रमाणे 8 लाख 84 हजार 400 रुपये अशी एकूण 16 लाख 82 हजार 400 रुपयांची वसुली केली आहे. विद्यार्थी व पालकांना घेतलेल्या रकमेची पावती न देता संगनमताने कट कारस्थान रचून हडप केली. वास्तविक विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली रक्कम संस्थेच्या बॅंक खात्यात जमा करणे आवश्‍यक असताना चौघांनी संस्थेशी लबाडीच्या उद्देशाने या रकमेचा अपहार केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून चौघांविरुद्ध (कलम-120(ब), 403, 405, 408, 409 आणि 320 प्रमाणे) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अकबर पटेल करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com