जळगाव घरकुलप्रकरणी २७ जूनला निकाल शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

धुळे - राज्यातील बहुचर्चित जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील  जिल्हा विशेष न्यायालयाकडून २७ जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणी शुक्रवारी कामकाज झाले. न्या. डॉ. सृष्टी निळकंठ या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्यांचा कार्यभार असलेले न्या. एस. आर. उगले यांच्यापुढे कामकाज चालले. त्यांनी २७ जूनला पुढील कामकाज होणार असल्याचे सांगितले.  

जिल्हा न्यायालयात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण व इतर वकिलांच्या उपस्थितीत न्या. उगले यांनी आरोपींची हजेरी घेतली. त्या वेळी ४८ पैकी ४७ आरोपी उपस्थित होते. न्यायालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त होता. 

निकालाच्या शक्‍यतेमुळे आज सर्व आरोपींना हजर राहण्याची सूचना होती. मात्र, त्यात पुष्पा पाटील या वैद्यकीय कारणामुळे अनुपस्थित होत्या. आरोपी तथा माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, मेजर नाना वाणी यांच्यासह इतर आरोपी हजर होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalgaon housing case possible decision on June 27