esakal | अबब...शेतकऱ्यांकडे किती ही थकबाकी 
sakal

बोलून बातमी शोधा

अबब...शेतकऱ्यांकडे किती ही थकबाकी 

राज्यात महाआघाडीचे शासन आले आहे. त्यांचा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा विचार आहे. जिल्हा बॅंकेपूरता विचार केल्यास 1 लाख 55 हजार सहा शेतकऱ्यांकडे 901 कोटीचे कर्जयेणे बाकी आहे. 

अबब...शेतकऱ्यांकडे किती ही थकबाकी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत केवळ जिल्हा बॅंकेचा विचार केला तर बॅंकेच्या 3 लाख 71 हजार 976 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफी झाल्यानंतरही 1 लाख 55 हजार सहा शेतकऱ्यांकडे 901 कोटी 58 लाख 64 हजारांची थकबाकी आहे. या व्यतिरिक्त इतर राष्ट्रीयकृत बॅंकेच्या शेतकऱ्यांकडील कर्जमाफीची रक्कम तितकीच समजली तर, सुमारे दोन हजार कोटींची मदत जिल्ह्याला कर्जमाफी पोटी शासनाकडून मिळाली तर जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकणार आहे. 

अवश्‍य वाचा > शेतकऱ्याच्या लेकीला 28 लाखाचे पॅकेज 

दोन वर्षापासून तत्कालीन राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. अगोदर संपूर्ण कर्जमाफी, नंतर ठरावीक वर्षातीलच कर्जमाफी, नंतर विविध अटीसह कर्जमाफी, शेवटी दीड लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी असे नियम लावले गेले. यामुळे अनेक शेतकरी नियमात न बसल्याने ते कर्जमाफीपासून वंचित राहिले. काहींकडे पाच लाखांचे कर्ज असेल तर त्यांना अगोदर साडेतीन लाख रूपये भरावे लागणार होते नंतरच त्यांना दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज न भरण्याकडे कल दिसला. नुकतेच राज्यात महाआघाडीचे शासन आले आहे. त्यांचा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा विचार आहे. जिल्हा बॅंकेपूरता विचार केल्यास 1 लाख 55 हजार सहा शेतकऱ्यांकडे 901 कोटीचे कर्जयेणे बाकी आहे. 

अधिक वाचा > बाहेरगावी गेले तरी घरावर नजर ठेवण्याची शक्‍कल 

आकडे बोलतात.. 
कर्जमाफी मिळालेले शेतकरी--3 लाख 7 हजार 376 
प्रोत्साहनपर लाभ मिळालेले शेतकरी--85 हजार 66 
पुनर्गठन केलेले शेतकरी--3 हजार 332 
कर्जमाफीची रक्कम--775 कोटी 69 लाख 72 हजार 855 
थकबाकीदार शेतकरी--1 लाख 55 हजार 6 
थकबाकीची रक्कम --901 कोटी 58 लाख 64 हजार 
 

loading image
go to top