जळगाव: शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील १ जुलै २०२५ च्या मतदार यादीतील मतदारसंख्या लक्षात घेता ६०० मतदान केंद्र असणार आहे. या केंद्रांसाठी ६६० कंट्रोल युनिट आणि १५०० बॅलेट युनिट लागणार असून, शासनाकडे तशी मागणी केली जाणार असल्याची माहिती आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.