मी भाजपत राहणार नाही हे सांगणारे राऊत कोण? - एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

निवडणुका एकाचवेळी शक्‍य
भाजपच्या दादर येथील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केल्यासंदर्भात विचारले असता खडसे म्हणाले, की पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लोकसभा व ऑक्‍टोबरमध्ये विधानसभा निवडणूक आहे. मात्र तत्पूर्वी नोव्हेंबर-डिसेंबरात मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधानसभा निवडणुका असल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत विचार सुरू आहे. त्यातून मुख्यमंत्र्यांनी सज्ज राहण्याचे सांगितले असावे आणि राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीसाठी कायमच सज्ज राहिले पाहिजे.

जळगाव - केवळ मंत्रिमंडळात नाही, म्हणून मी गेल्या चाळीस वर्षे ज्या पक्षात आहे तो कसा सोडेल? आणि आपण भाजपत राहणार नाही, हे सांगणारे संजय राऊत कोण आहेत, असा सवाल माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज केला. राऊत यांच्या टीकेला गिरीश महाजनांनी परस्पर उत्तर दिले हे बरेच झाले, असेही ते म्हणाले.

जळगावातील "मुक्ताई' या निवासस्थानी खडसेंनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून आपल्या पक्षबदलाच्या चर्चा सुरू असल्याबाबत तसेच राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात खडसेंना विचारले असता ते म्हणाले, 'सध्या मी मंत्रिमंडळात नसल्याने अनेकांना माझ्याबद्दल सहानुभूती वाटते, ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांच्या सहानुभूतीसाठी मी माझा पक्ष कसा सोडणार? गेल्या चाळीस वर्षांपासून मी भाजपत प्रामाणिकपणे काम करीत आहे. जिल्ह्यात-खानदेशात आपण हा पक्ष उभा केला. असे असताना मी पक्ष सोडण्याचा विचारही करू शकत नाही. संजय राऊत यांना माझ्याबद्दल चिंता करण्याचे कारणच नाही, त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे करावे.''

निवडणुका एकाचवेळी शक्‍य
भाजपच्या दादर येथील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केल्यासंदर्भात विचारले असता खडसे म्हणाले, की पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लोकसभा व ऑक्‍टोबरमध्ये विधानसभा निवडणूक आहे. मात्र तत्पूर्वी नोव्हेंबर-डिसेंबरात मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधानसभा निवडणुका असल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत विचार सुरू आहे. त्यातून मुख्यमंत्र्यांनी सज्ज राहण्याचे सांगितले असावे आणि राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीसाठी कायमच सज्ज राहिले पाहिजे.

Web Title: jalgaon maharashtra news eknath khadse talking