जळगाव मनपाच्या आयुक्तपदी प्रथम महिला आयुक्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. माधवी खोडे- चवरे यांची नियुक्ती झाली आहे. महापालिकेच्या त्या 38 व्या तर जळगाव शहर महापालिकेच्या महिला आयुक्त म्हणून पहिल्या आयएएस अधिकारी असणार आहेत.

जळगाव : तत्कालीन आयुक्त डॉ. उदय टेकाळे हे 31 जानेवारीला सेवानिववृत्त झाल्यानंतर बारा दिवसानंदर आज जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. माधवी खोडे- चवरे यांची नियुक्ती झाली आहे. महापालिकेच्या त्या 38 व्या तर जळगाव शहर महापालिकेच्या महिला आयुक्त म्हणून पहिल्या आयएएस अधिकारी असणार आहेत. डॉ. खोडे या 17 फेब्रुवारीला रुजू होणार आहेत. 

महापालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे हे सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे प्रभारी देण्यात आला होता. बारा दिवसानंतर त्यांच्या रिक्त जागेवर नागपूर येथील वस्त्रोद्योग मंडळाच्या संचालिका डॉ. माधवी खोडे-चवरे यांची आज नियुक्ती झाली आहे. त्या यापूर्वी भंडारा, चंद्रपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, 2013 ते 2015 पर्यंत भंडारा येथील जिल्हाधिकारी, 2015 ते 2018 पर्यंत आदिवासी विभाग, नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत 
होत्या. तर 2018 पासून वस्त्रोद्योग मंडळ, नागपूर येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. 

नक्की पहा : आहो हे काय..."हग डे' ला पोलिसांनी मारली मिठी...! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news algaon Municipal Commissioner First Women Commissioner