आहो हे काय..."हग डे' ला पोलिसांनी मारली मिठी...! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

जळगावच्या मेहरुण चौपाटीवर एकांतात बसलेल्या कोवळ्या पोरांची फोटो काढून त्यांच्याकडून खंडण्या वसुल करणाऱ्या तोतया पोलिसांना खऱ्या पोलिसांनी व्हॅलेन्टाईन डे चे भेट देत "हग' देत गंचाडी पकडून त्यांच्या मुसक्‍या आवळल्या.

जळगाव : सद्या शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह संपूर्ण तरुणाई व्हॅलेन्टाईन-वीक उत्साहात साजरा करतांना दिसत आहे. त्यात बुधवारी (ता.12) जळगावच्या मेहरुण चौपाटीवर एकांतात बसलेल्या कोवळ्या पोरांची फोटो काढून त्यांच्याकडून खंडण्या वसुल करणाऱ्या तोतया पोलिसांना खऱ्या पोलिसांनी व्हॅलेन्टाईन डे चे भेट देत "हग' देत गंचाडी पकडून त्यांच्या मुसक्‍या आवळल्या. पवन काळे(वय-23 रा.तरसोद), रविंद्र चौधरी (वय-23,रा.भादली) असे दोघा भामट्यांची नावे असून सचिन पाटील या खऱ्याखुऱ्या पोलिसाने या भामट्यांना अटक केली आहे. 

जळगाव शहरातील मेहरुण चौपाटीवर विदेशी पक्षांसह आता कोवळ्या प्रेमवीरांचे थवे आडोशा धरुन कुजबुज करु लागले आहे. वॅलेन्टाईन-वीक सुरु असल्याने वेगवेगळ्या दिवशी मित्रमैत्रीणीं एकमेकांना शुभेच्छा देत व्हॅलेन्टाईन-डे पर्यंत संपुर्ण आठवडा साजरा करत असुन प्रिय-मित्राला मिठी मारण्याचा "हग-डे' बुधवारी मेहरुण चौपाटीवर साजरा झाला. मेहरुण चौपाटीवर बसलेल्या मुला-मुलींचे मोबाईल 

नक्की पहा : जळगाव महापालिकेचे अंदाजपत्रक 1141 कोटींचे 
 

मध्ये फोटो काढून त्यांच्याकडून तोतया पोलिस पवन काळे व त्याचा साथीदार रविंद्र चौधरी (वय-23, भादली) खंडणी उकळत असतांनाच त्यांच्यावर एमआयडीसीच्या खऱ्याखुऱ्या पोलिसांनी छापा टाकला. ताब्यात घेतलेल्या दोघा भामट्यांच्या विरुद्ध जबरी लूट आणि तोतया गिरी केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात येवुन न्यायाधीश अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघा भामट्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

आर्वजून पहा : धक्कादायक...आईची पाठ फिरताच बालिका दारातून बेपत्ता !
 

वॉचमनचा झाला पोलिस 
पवन रमेश चौधरी हा तरुण ओरीएंट सिमेंट कंपनीत वॉचमन म्हणुन कार्यरत असुन त्याने पोलिसांप्रमाणे कमांडो ड्रेस, पोलिसांची फायबर काठी आणि रिव्हॉल्वरचे सरकारी कव्हर खरेदी करुन खंडण्या वसुल करण्याचा धंदा सुरु केल्याचे या गुन्ह्यात आढळून आले आहे. 

नक्की पहा :जिल्ह्यातून चार लाख क्विंटल केळीची होणार निर्यात
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marathi news Impersonation police Arrested by jalgaon palicej