बापरे...जेवणाच्या ताटात अळ्या, केसं अन्‌ किडे ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी चालवल्या जाणाऱ्या खाणावळीच्या जेवणाच्या ताटात आज अळ्या, केसं, किडे दिसले. अन्‌ पुढे काय मग शंभर ते दिडशे विद्यार्थीनींनी वसतीगृहाच्या आवारातच ठिय्या मांडून तीव्र स्वरुपाचा विरोध आंदोलन केले.

जळगाव : शहरातील नंदिनीबाई वामनराव मुलींचे महाविद्यालय व बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी चालवल्या जाणाऱ्या खाणावळीच्या जेवणाच्या ताटात आज अळ्या, केसं, किडे दिसले. अन्‌ पुढे काय मग शंभर ते दिडशे विद्यार्थीनींनी वसतीगृहाच्या आवारातच ठिय्या मांडून तीव्र स्वरुपाचा विरोध आंदोलन केले. महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ दखल घेत मेस बंद करण्याचे आदेश दिले आहे. 

महाविद्यालयातील वसतीगृहात अडीशे ते, तीनशे विद्यार्थींनी वास्तव्यास आहेत. वसतीगृहातील विवीध समस्या आणि खासकरुन जेवणाच्या वारंवार तक्रारी करुनही उपाय योजना होत नाही. म्हणून आज चक्क दिडशेच्यावर विद्यार्थीनींनी जेवणावर बहिष्कार टाकत आंदोलन पुकारले. सकाळच्या जेवणाच्या वेळेस शंभर ते दिडशे तरुणी मेसमध्ये जेवणाला आल्या असतांना वाढलेल्या वांग्याच्या भाजीत अळ्या आणि वरणभातात किडे आढळून आल्याने विद्यार्थींनीच्या संतापाचा पारा वर चढला. मेसचालक चालकाला जाब विचारात या विद्यार्थींनी आवारातच अंदोलनाचा पावित्रा घेवून ठिय्या मांडला. चार मजली वसतीगृह आवारातच मुलींनी उभारलेल्या आंदोलनामुळे महाविद्यालयीन प्रशासन अचानक खडबळून जागे झाले. वसतीगृहाच्या रेक्‍टर कुमोदिनी पाटील यांनी तत्काळ मेस बंद करण्याच्या सुचना दिल्या. 

आर्वजून पहा ः बेंडाळे महाविद्यालयाच्या खाणावळीत पुरवठा विभागाची कारवाई 

वस्तीगृहातही समस्या 
महिला वसतीगृहात बाहेरील तरुणांना येण्यास मनाई असतांना शौचालय, स्नागृहे सफाई साठी प्रत्येकच ठेकेदाराकडून वेळेस वेगवेगळे माणसं येथे येतात. मुलींचा वापरात असलेल्या या शौचालया बाबत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांची अनेकवेळेस मागणी करुनही उपयोग होतनाही.तक्रारी केल्या की, रेक्‍टर कडून घाणेरड्या भाषेत त्रास दिला जातो. 

नक्की पहा ः हिंगोणा अपघात ग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news bedale college hoostel keechan studant Protest movement