बेंडाळे महाविद्यालयाच्या खाणावळीत पुरवठा विभागाची कारवाई 

बेंडाळे महाविद्यालयाच्या खाणावळीत पुरवठा विभागाची कारवाई 

जळगाव ः येथील डॉ. जी. डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या खाणावळीत घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याने छापा टाकून 21 घरगुती गॅस सिलिंडर जप्त आज करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पुरवठा विभागाने केली आहे. 

जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना आज सायंकाळी सातला निनावी फोन आला. की बेंडाळे महाविद्यालयाच्या ओम साई कॅन्टीनमध्ये स्वयंपाक तयार करण्यासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत आहे. त्यानुसार तालुका पुरवठा निरीक्षक के. आर. तडवी छापा टाकून सिलिंडरची तपासणी केली. त्यात हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम कंपनीचे 21 घरगुती सिलिंडर आढळून आले आहेत. त्यापैकी चार भरलेले आहेत तर 17 रिकामे आहेत. यावरून बेंडाळे महाविद्यालयाच्या ओम साई कॅन्टीनमध्ये सर्रास घरगुती सिलिंडरचा वापर होतो. जो चुकीचा आहे. कमर्शिअल सिलिंडर वापरणे गरजेचे होते. कॅन्टीनचे मालक प्रवीण चावला आहे. मात्र त्यांनी पुरवठा विभागाने केलेल्या पंचनाम्यावर सही करण्यास नकार दिला. 
जितेंद्र पाटील यांना यासाठी नेमले असल्याचे सांगत पाटील यांना सही करण्यास सांगितले आहे. 


बेंडाळे महाविद्यालयाच्या ओम साई कॅन्टीनमध्ये घरगुती सिलिंडर आढळून आले आहे. त्याची चौकशी करून हे सिलिंडर नेमके कोठून आले. कोणाच्या नावावर होते याची चौकशी करून संबंधितावर कारवाई होईल. 
- सुनील सूर्यवंशी जिल्हा पुरवठा अधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com