बिबट्यामुळे दरेगावात भीतीचे वातावरण; शेळीचा पाडला फडशा

दीपक कच्छवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मजुर शेतात येईना...
या परिसरात सध्या कपाशी वेचणीचे कामे सुरू आहे. शेतात कपाशी फुटल्याने कपाशी वेचायला मजुर धजावत नाही. दहा महिला मजुर मागे दोन माणसे रोजाने लावावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.तरी या भागात वनविभागाने  जनजागृती करून शेतकर्याच्या मनातली भीती मिटवावावी अशी मागणी होत आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे वासराचा फडशा पाडल्याची घटना ताजी असतानाच आज येथील शेळी पालकाने दरेगाव शिवारात चराईसाठी नेलेल्या शेळ्यांमधील एक शेळी गायब असून तिला बिबट्याने हल्ला करून नेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणाहून शेळी नेली त्या ठिकाणी रक्त सांडलेले आढळून आले आहे. त्यामुळे पुन्हा या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वरखेडे येथील बुधा सखाराम कावरे हे नेहमी प्रमाणे  शेळ्या चराईसाठी  दरेगाव शिवारातील  चोपसिंग पाटील यांच्या शेताजळील नाल्याजवळ शेळ्या चारत होते. काल (दि. 4) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या शेळ्यांच्या कळपातील एक मोठी शेळी गायब झालेली दिसली.

शेळीची शोधा शोध...
बुधा कावरे व त्यांचा मुलगा पिंटू कावरे यानी शेळीचा शोध घेणे सुरू केले. मात्र, त्यांना कुठेही शेळी अढळुन आली नाही. परंतु नाल्यात एका ठिकाणी रक्ताचे थारोळे आढळले. तेथूनच शेळी गायब झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्या ठिकाणाहून जंगल परिसर जवळच आहे. त्यामुळे बिबट्यानेच त्यांच्या शेळी फडशा पाडला असल्याचे बुधा कावरे यांनी सांगितले. त्यांचे जवळपास दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्याना नुकसान भरपाई मिळावी आशी मागणी होत आहे.

वन विभागाला अपयश...
गिरणा परिसरातल्या हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला अपयश येत असल्याचे समोर येत आहे. सहा पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावूनही बिबट्या या पिंजऱ्यात अडकला नाही व कॅमेऱ्यात ट्रॅप झाला नाही. दर वेळेस बिबट्या हल्ला करून वन विभागाच्या हातावर तुरी देऊन पळत आहे.

मजुर शेतात येईना...
या परिसरात सध्या कपाशी वेचणीचे कामे सुरू आहे. शेतात कपाशी फुटल्याने कपाशी वेचायला मजुर धजावत नाही. दहा महिला मजुर मागे दोन माणसे रोजाने लावावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.तरी या भागात वनविभागाने  जनजागृती करून शेतकर्याच्या मनातली भीती मिटवावावी अशी मागणी होत आहे.

Web Title: jalgaon marathi news chalisgaon leopard kills goat