फडणवीस केंद्रात गेल्यास आनंद होईल ः खडसे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

देवेंद्र फडणवीस यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले तर आनंद होईल. त्यापेक्षा महाराष्ट्राला त्यांचा चांगला उपयोग होईल, असे मत खडसेंनी व्यक्त केले. 

जळगाव ः देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची राजकीय वर्तूळात सद्या चर्चा 
सुरू आहे. यावर माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले तर आनंद होईल. त्यापेक्षा महाराष्ट्राला त्यांचा चांगला उपयोग होईल, असे मत खडसेंनी व्यक्त केले. 

सद्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे वारे असून तेथे भाजपच्या प्रचारात भाजपचे सर्वच नेते आहे. निवडणूक झाली की केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची सद्य जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या राजकीय हालचालीवर श्री. खडसे बोलतांना 
म्हणाले, की आपले सहकारी केंद्रात जात असतील तर त्याचा आनंद असून दिल्लीत त्यांचे स्वागत आहे. दिल्लीने एकदा सांगितले की मार्ग सुकर होतो. पक्षाने दिलेला आदेश अंतिम असतो असे ते म्हणाले. 

नक्की पहा ः विभाग नियंत्रकाला महिला वाहकाची स्थानकातच मारहाण 
 

तर...महाराष्ट्रात पून्हा एकत्र 
महाराष्ट्रात शिवसेना सोबत देवेंद्र फडणवीस यांचे संबंध ताणले गेल्याने भाजप सत्तेपासून दूर राहिले. त्यामुळे केंद्रात फडणवीस गेल्यास महाराष्ट्रात पून्हा भाजप-शिवसेना संबंध सुधारू शकतात असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच भाजपच्या गोटात देखील याबाबत हालचाली सुरू आहे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 
 

आर्वजून पहा ः अन्‌ जखमीसाठी रेल्वे धावली... पण उलटी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Dēvēndra phaḍaṇavis go to the Delhi i am happy Eknathrao Khadse