जिल्हा बॅंकेच्या निवडणूका का... पुढे ढकल्या : एकनाथराव खडसे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

कोणतेच कारण नसतांना शासनाने जिल्हा बॅंकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय चुकिचा आहे. असे मत माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. 

जळगाव : दुष्काळ तसेच युध्दजन्य परिस्थितीमध्ये राज्यातील जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूका पुढे ढकलता येतात. मात्र असे कोणतेच कारण नसतांना शासनाने जिल्हा बॅंकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय चुकिचा आहे. असे मत माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. 

जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, की राज्यातील 22 जिल्हा सहकारी बॅंकाच्या संचालक मंडळाच्या निवडणूका तीन महिने शासनाने पुढे ढकलल्या आहेत. शासनाचा हा निर्णय अत्यंत चुकिचा आहे. शासनला हा अधिकारच नाही. सहकार संस्थाच्या निवडणूकासाठी राज्य सहकारी प्राधीकरणाचा स्वतंत्र विभाग आहे. त्यांच्यामार्फतच निवडणूका घेण्यात येत आहे.निवडणूका घेण्याचे तसेच पुढे ढकलण्याचे अधिकारही त्यांना आहेत. जर शासनाला या निवडणूका पुढे ढकलायच्या असल्यास दुष्काळ तसेच युध्दजन्य परिस्थितीत त्यांना या निवडणूका पुढे ढकलता येतात. परंतु आता सद्या तशी कोणतीही परिस्थिती नाही. केवळ कर्जमुक्तीसाठी प्रशासनाचे कर्मचारी कामात असल्यामुळे निवडणूका पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण होवू शकत नाही. कारण प्रशासना कसे हाताळावे हे शासनानेच ठरवायचे असते तो शासनाचा प्रश्‍न असतो. त्याचा निवडणूकीशी कोणताही संबध येत नाही. 
 

आर्वजून पहा ः बेंडाळे महाविद्यालयाच्या खाणावळीत पुरवठा विभागाची कारवाई 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news District Bank Elections Pushed forward