आरटीओ विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले धिंडवडे
जळगाव ः जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक केली जाते.... शाळांच्या व्हॅनमध्येही पोरं दाबून भरली जातात.... एस.टी. बसेसच्या मुदत संपल्या आहेत... ओव्हरलोड ट्रक भरधाव जातात.... दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाही.... हे सारे डोळ्याने दिसत असताना वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन
विभागाकडून कुठल्याही प्रकारच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने खुद्द जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या दोन्ही विभागाचे अक्षरश: धिंडवडे काढले.
खासदारांच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या रस्ता शक्ती समितीची बैठक आज नियोजन भवनात झाली. अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे होत्या. खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे उपस्थित होते. नव्याने स्थापन झालेल्या या समितीच्या कामकाजाबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लोही यांनी माहिती दिली. या बैठकीला सदस्य असलेल्यांचीही त्यांनी माहिती दिली. मात्र समितीची
पहिलीच बैठक असल्याने कुठल्याही प्रकारची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नव्हती. त्यामुळे खासदार खडसे, खासदार पाटील यांनी पुढील बैठकीच्या आधी महिनाभरात जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा, कर्मचाऱ्यांची संख्या, अपघातांची संख्या, ब्लॅक स्पॉटबाबतची परिपूर्ण माहिती सादर करण्यास सांगितले.
हेल्मेट सक्ती कधी ?
अपघातांचे वाढते प्रमाणावरून जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी हेल्मेट सक्तीचा विषय काढला. यावर हेल्मेट सक्ती बाबत सर्कुलर काय काढता? कायदाच असल्याची आठवणही त्यांनी उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी शाम लोही यांना करून दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.