डॉक्‍टरने दोन इंन्जेक्‍शन देताच...मुलगा झाला शांत ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

शहरातील इंडो अमेरीकन दवाखान्यात आणले. उपचारा दरम्यान हातपाय झटकत असल्याने डॉक्‍टरांनी त्याला तातडीने दोन इंजेक्‍शन देताच मुलगा शांत झाला.

जळगाव : विखरण (ता.एरंडोल) येथील सोळावर्षीय बालकास डोके दुखी आणि अंगात ताप भरल्याने गावातील डॉक्‍टरांनी जळगावी नेण्याचे सांगितले. कुटूंबींयानी बालकाला जळगाव शहरातील इंडो अमेरीकन दवाखान्यात आणले. उपचारा दरम्यान हातपाय झटकत असल्याने डॉक्‍टरांनी त्याला तातडीने दोन इंजेक्‍शन देताच मुलगा शांत झाला. काही वेळाने नातेवाईकांना शंका आल्याने डॉक्‍टरांना विचारणा केल्यावर त्यांनी सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. अन्‌ सिटीस्कॅन आणताच त्याचा मृत्यू झाल्याचे तपासणीपुर्वीच सांगण्यात आल्याने संतप्त नातेवाईकांनी इंडोअमेरिकन हॉस्पीटल गाठून गोंधळ घालत डॉक्‍टरांना जाब विचापरून गोधंळ घातला. 

एरंडोल तालूक्‍यातील विखरण येथील रहिवासी व इयत्ता दहावीत असलेला पवन शरद कोळी (वय-16)याला डोकेदुखी, अंगात प्रचंड ताप असल्याने त्याला जळगाव शहरातील इंडो अमेरिकन हॉस्पीटल येथे आज दुपारी 12:30 वाजता आणले. उपचार सुरु झाल्यानंतर वीस मिनटातच त्याचा झटके आल्याने डॉक्‍टरांनी त्याला एकामागून एक असे दोन इंन्जेक्‍शन दिले. त्यानंतर पवन याने डोळेबंद करुन घेत तो शांत झाला. कुटूंबीयांना तो बरा होत असल्याचे लक्षात येत नाही तोवर डॉक्‍टरांनी त्याचे सिटीस्कॅन करावे लागेल असे, सांगत तातडीने नातेवाईकांसोबत सिटीस्कॅनसाठी पाठवीले. रिंगरोडवरील शिवम सिटीस्कॅन सेंटरवर पोहचल्यावर तेथील डॉक्‍टरांनी तपासणीपुर्वीच हा मयत झाल्याचे सांगीतले. नातेवाईकांनी पवनला घेवून इंडोअमेरीकन हॉस्पीटल गाठथ हॉस्पीटलच्या प्रमुख डॉक्‍टरांना भेटण्याचा आग्रह धरला. परंतू डॉक्‍टर मात्र नसल्याने नातेवाईकांनी एकच गर्दी करत गोंधळ घातला. तर योगेचा मामाने डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर दवाखान्याचे संचालकांनी मयत योगेश आधीच गंभीर अवस्थेत असल्याचे सांगितले. 

नक्की पहा ः अबब...रेल्वेमूळे नोकरदारांवर बेरोजगार होण्याची वेळ ! 
 

रुग्णालयात आले पोलिस 
रुग्णलयात बालकाचा मृत्यु झाल्याने गोंधळ उडाल्याने शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम, यांच्यासह इतर कर्मचारी दाखल झाले मात्र, जमाव अधिक असल्याने मुख्यालय आणि गुन्हेशाखेच्या अतिरीक्त कुमक घटनास्थळावर दाखल झाली. पोलिसांनी नातेवाईक व कुटूंबीयांना शांत करण्याचा खुपच प्रयत्न केला. 

आर्वजून पहा ः फोन टॅपिंग चौकशीतून खर काय ते समोर येईल : एकनाथराव खडसे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news gold city hospital doctor boy Injection and boy deth