अबब...रेल्वेमूळे नोकरदारांवर बेरोजगार होण्याची वेळ ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्र एक्‍स्प्रेस दोन ते तीन तास उशिराने पोहचत आहे. त्याच आज कहर होत चक्क पाच तास उशिराने पोचली. यामुळे अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना रोज "लेटलितीफी'ला सामोरे जावे जागत आहे.

जळगाव ः जळगाव शहरात बाहेर गावावरून येणाऱ्या तब्बल दहा हजार चाकरमानांवर रेल्वेमुळे बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून मनमाड कडून जळगावला सकाळी येणारी महाराष्ट्र एक्‍स्प्रेस दोन ते तीन तास उशिराने पोहचत आहे. त्याच आज कहर होत चक्क पाच तास उशिराने पोचली. यामुळे अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना रोज "लेटलितीफी'ला सामोरे जावे जागत आहे. रेल्वे प्रशासनाने किमान सकाळी नऊ ते दहापर्यंत जळगावला पोचेल अशी रेल्वे सुरू करावी अशी मागणी होत आहे. 

जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा येथून दररोज सुमारे दहा हजार चाकरमानी अपडाऊन करून जळगाव येथे उपजीविकेसाठी येतात. परंतू रेल्वे विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. बहुतांश शासकीय व खासगी कार्यालये साधारण नऊ दहाला वाजता सुरू होतात. अप डाउन करणारे नोकरदार, विद्यार्थी व व्यापारी शेतकरी यांची जीवनवाहिनी असलेली महाराष्ट्र एक्‍स्प्रेस दररोज नऊच्या आत जळगावला येते. वेळेवर ऑफिसला पोचवते. मात्र मागील 15 दिवसांपासून महाराष्ट्र एक्‍स्प्रेस (डाऊन 11039) दररोज तीन ते चार तास उशिराने धावत आहे. तसेच देवळाली भुसावळ पॅसेंजर ( 51181) ही देखील एक ते दोन तास दररोज उशिरा धावते. यामुळे रोजच ऑफिस लेटमार्क मुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी येणाऱ्या या सर्वसामान्य चाकरमान्यांना कोणताही उद्योजक कामास ठेवण्यास धजावत नाही. परिणामी नोकरदारांवर बेरोजगार होण्याची वेळ येत आहे. 

नक्की पहा ः  फोन टॅपिंग चौकशीतून खर काय ते समोर येईल : एकनाथराव खडसे 

"ट्‌विटर'वरून तक्रार..तरीही.. 
ट्‌विटरच्या माध्यमातून रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाबाबत आज तक्रार अपडाऊन करणाऱ्यांना भुसावळच्या "डीआरएम' यांना केली. पण त्यावर फक्त "सॉरी फोर इन्कन्व्हेअन्स अँड इन्स्ट्रक्‍शन गिवन टू कॉन्स्टंट ऑफिसर'.. असे जुजबी उत्तर येते. 
 

आर्वजून पहा ः गावाकडे निघाले... अन्‌ पतीच्या डोळ्यासमोर पत्नीचा मृत्यू ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Maharashtra Express dayli let by jalgaon stishen Unemployed by rail