फोन टॅपिंग चौकशीतून खर काय ते समोर येईल : एकनाथराव खडसे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

 खडसेंनी म्हणाले, की फोन टॅपिंगबाबत शासन चौकशी करीत आहे, त्यामुळे त्यातून खरे काय ते सत्य समोर येईल. 

जळगाव: देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात भाजपचेच माजी मंत्री एकनाथराव खडसे याचा फोन टॅपिंग होत असल्याचे वृत्त माध्यमामध्ये आले. त्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली असून याबाबत खडसेंनी म्हणाले, की फोन टॅपिंगबाबत शासन चौकशी करीत आहे, त्यामुळे त्यातून खरे काय ते सत्य समोर येईल. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅंपिग करण्यात येत असल्याचा आरोप नुकताच इंग्रजी माध्यमातून करण्यात आले. त्यानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीच्या आदेशात विरोधी पक्षनेत्यासोबत माजी मंत्री व भाजपा नेते एकनाथराव खडसे यांचेही फोन टॅप होत असल्याचे म्हटले आहे. तत्कालीन राज्य सरकारमधील एक आयपीएस अधिकारी इस्त्रायल दौऱ्यावर जावून त्यांनी फोन टॅप करण्याचे सॉप्टवेअरही तेथून खरेदी केले असल्याचे वृत्तात म्हतले होते. 

नक्की पहा ः जळगावात पाच हजार मुलींना मिळणार स्वः रक्षणाचे धडे... 
 

भाजप नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे दिल्ली येथे विधानसभा निवडणूकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचे कार्य करीत आहेत. याबाबत त्याच्यांशी भ्रमणध्वनीवर "सकाळ'ने संपर्क साधला असता. खडसे म्हणाले, आपणही इंग्रजी वृत्तपत्रात ते वृत्त वाचले आहे, त्याबाबत राज्यशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यामुळे त्या चौकशीत खरे काय ते निष्पन्न होवून सत्य समोर येईल. मात्र त्या काळात काही शासनातील अधिकारी आपल्याला याची जाणीव करून देत होते. परंतु आपला त्यावर विश्‍वास नसल्यामुळे त्याकडे आपण लक्ष देत नव्हतो. असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आता चौकशीत खरे काय ते समजेल. 
 

आर्वजून पहा ः गावाकडे निघाले... अन्‌ पतीच्या डोळ्यासमोर पत्नीचा मृत्यू ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Phone Tapping Inquiries Out What Is Real Eknathrao Khadse