"मनपा'च्या शंभरावर लेटलतिफांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

उपायुक्त अजित मुठे, महापौर भारती सोनवणे यांनी आज लेटलतीफ व गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

जळगावः महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वाराजव उपायुक्त अजित मुठे, महापौर भारती सोनवणे यांनी आज लेटलतीफ व गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत शंभरावर लेटलतीफ कर्मचारी आढळले तर 30 महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे गुटखा आढळून आला. 

महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी  महापौर भारती सोनवणे व उपायुक्त अजित मुठे यांनी आस्थापना व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कल्पना न देता बोलावून घेत कर्मचाऱ्यांची तपासणी केली. सकाळी 9.55 वाजेनंतर महापालिकेत येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्यात आली. यात उशिरा येणाऱ्या अधिकारी 
व कर्मचाऱ्यांची यादी आस्थापना अधीक्षक हरिश्‍चंद्र खडके यांनी केली. लेटलतीफ सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

नक्की पहा ः टि-शर्ट वरील वाचला मजकूर...अन्‌ सापडला डॉक्‍टर "मुन्नाभाई'

हजेरी पुस्तक ताब्यात 
तपासणीदरम्यान 55 कर्मचारी उशिरा आढळून आले. त्यानंतर उपायुक्तांनी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तक आस्थापना विभागात जमा करण्याचे निर्देश दिले. शंभरावर लेट लतीफ कर्मचारी आज पाहणी दरम्यान आढळून आले. सायंकाळी या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. 

हेपण पहा ः  लंघुशंकेसाठी थांबला...अन्‌ झाला अनर्थ ! 
 

गुटखा खाणाऱ्यांना दंड 
जागतिक कर्करोग दिन, त्यात अचानक तपासणी झाली. यात महापालिकेतील कर्मचारी तसेच येणाऱ्या नागरिकांची देखील तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत 30 महापालिकेचे कर्मचाऱ्यांकडे गुटखा आढळून आला. त्यांना प्रत्येकी 200 रुपये दंड आकारण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news jalgaon mahapalika hundred staff workars letmark