जळगाव महापालिकेत 27 जानेवारीला होणार महापौरपदाची निवड 

mahapalica imarat
mahapalica imarat

जळगाव ः सिमा भोळे यांनी महापौरांच्या राजिनामा दिल्यानंतर महापौर निवडीबातचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना महापालिका प्रशासनाने पाठविला होता. त्यानुसार महापौर निवडीचा कार्यक्रम आज जाहीर झाला असून (ता. 27) रोजी सकाळी 11 वाजता पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत विशेष सभा होणार आहे. 

महापालिकेची 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आली. आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौरपदी एका वर्षासाठी निवड झाली होती. त्यानुसार पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वर्षभरानंतर 7 जानेवारीला सीमा भोळे यांनी आयुक्तांकडे राजीनामा दिला होता. 
त्यामुळे महापौर निवडीसाठी विभागीय आयुक्तांना महापालिकेने प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कार्यक्रम जाहीर केला आहे. 


महापौरसाठी मोर्चा बांधणीला वेग 
महापौर पदाच्या रेसमध्ये भाजपचे चार जण ईच्छूक असून पक्षीश्रेष्टीकंडे दावेदारीसाठी मोर्चा बांधणीला आता वेग आला आहे. यात सर्वात आधी आघाडीवर नाव कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे यांचे आहे. तरी प्रतिभा कापसे, उज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण या इच्छूक उमेदवार देखील आपली दावेदारी करणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com