जळगाव मनपावर धडकल्या घंटागाड्या....! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

वॉटर ग्रेस कंपनीच्या कचरा संकलन करणारे घंटागाड्या तसेच स्किप लोडर आदी कचरा संकलनावरील वाहनावरील चालकांनी महापालिकेवर आज थेट वाहने आणून धडक मोर्चाच काढला.

जळगाव ः जळगाव शहर महापालिकेने दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेचा मक्ता नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला दिला. मात्र पाच महिन्यातच मक्तेदाराच्या कचरा संकलन, स्वच्छता तसेच सफाई कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत व किमान वेतन नुसार मिळत नसल्याने अनेकदा आंदोलन झाले. त्यात आज वॉटर ग्रेस कंपनीच्या कचरा संकलन करणारे घंटागाड्या तसेच स्किप लोडर आदी कचरा संकलनावरील वाहनावरील चालकांनी महापालिकेवर आज थेट वाहने आणून धडक मोर्चाच काढला. त्यात सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिकेत आलेल्या आयोगाकडे आपल्या गऱ्हाणे मांडत निवेदन दिले. 

जळगाव महापालिकेने पाच वर्षासाठी नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला 75 कोटीचा स्वच्छतेचा मक्ता दिला. 16 ऑगस्ट महिन्यात सुरू झाला पाच महिन्यात मक्तेदाराच्या कामावर अनेक प्रश्‍न चिन्ह निर्माण होत कामगारांच्या वेतना दोन ते तिन महिने न देणे. दिवाळीत वेतन दिले ते अर्धे, त्यानंतर किमान वेतनानुसार वेतन मिळत नसल्याने अनेकदा घंटागाड्यावरील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तर एका चालकाने अंगावर पेंट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात वारंवार मक्तेदारांकडील चारशे कर्मचाऱ्यांना किमान वेतनानूसार पगार दिले गेलेले नाही. तसेच कामावर रुजू करण्याचे करार अद्याप कंपनीने केलेला नाही. तसेच कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, ईएसआसी, पीएफची 
रक्कम आदी कोणत्या ही सुविधा केलेली नाही. याबाबत आज थेट मक्तेदाराचे घंटागाड्यावरील चालकांनी वाहने घेत महापालिकेवर धडक मारली. तसेच महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांचा आलेल्या आयोगाकडे 
निवदन देत मक्तेदाराबाबत तक्रार केली. 

आर्वजून पहा :अनेक बळी घेऊनही चौपदरीकरणाचे काम ठप्पच! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news jmc water grees kampany leber morcha