डबघाईतील "महानंदा' चार वर्षात चांगल्या स्थितीत : खडसे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

चार वर्षात राजकारण झालं असा आरोप राज्याचे पशु व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केला होता. मात्र त्याला उत्तर देतांना माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे म्हणाले, गेल्या चार वर्षात परिस्थिती अत्यंत चांगली झाली आहे. तीला "आयएसओ' प्रमाणपत्र मिळाले आहे.

जळगाव : महाराष्ट्र राज्य दूध महासंघ अर्थात "महानंदा'मध्ये गेल्या चार वर्षात राजकारण झालं असा आरोप राज्याचे पशु व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केला होता. मात्र त्याला उत्तर देतांना माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे म्हणाले, गेल्या चार वर्षात परिस्थिती अत्यंत चांगली झाली आहे. तीला "आयएसओ' प्रमाणपत्र मिळाले आहे. "महानंद'च्या चेअरमनपदी गेली चार वर्षे खडसे यांच्यां पत्नी मंदाकिनी खडसे होत्या. 

गेल्या आठवड्यात राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुनील केदार जळगावला आलेले असतांना त्यानी गेल्या पाच 
वर्षात "महानंद' मध्ये राजकारणच झाल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी त्यावेळी कोणाचेही नाव घेतले नव्हते. परंतु गेल्या चार वर्षात "महानंद'वर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चेअरमन होत्या. आज एकनाथराव खडसे यांना "महानंद' संदर्भात पत्रकारांनी प्रश्‍न विचारला खडसे म्हणाले, 
गेल्या चार वर्षापूर्वी पंधरा वर्षे "महानंद'परिस्थिती अत्यंत बिकट होती, संस्थेला उतरती कळा लागली होती. 
मात्र गेल्या चार वर्षापूर्वी सत्तातंर झाले. त्यानंतर "महानंद'मधील असलेली बेशिस्त मोडून काढीत ती बळकट केली, तीला "आयएसओ'प्रमाणपत्र मिळाले आहे. आता संस्था अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. 
 

आर्वजून पहा :नगरसेवकपदी शिवसेनेच्या निता सोनवणे बिनविरोध 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news mahaada In good condition in four years Eknathrao Khadse stetment