खडसेंच्या मुक्ताई कारखान्याला  जिल्हा बॅंकेकडून बेकायदा कर्ज 

खडसेंच्या मुक्ताई कारखान्याला  जिल्हा बॅंकेकडून बेकायदा कर्ज 

जळगाव ः जिल्हा बॅंकेतर्फे शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही. मात्र, मुक्ताईनगर साखर कारखान्याला बेकायदेशीर कर्ज वितरण केले जात आहे. हा कारखाना भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी खरेदी केलेला आहे. त्याला कोणत्या आधारावर कर्ज दिले जात आहे, असा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
 
येथील पद्‌मालय विश्रामगृहात आज आयोजित पत्रकार परिषदे ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, की जिल्हा बॅंकेत एकनाथराव खडसे यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर चेअरमन आहेत. तर संत मुक्ताई साखर कारखाना एकनाथराव खडसे व शिवाजी जाधव यांनी 49 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. त्यामुळे त्याला 51 कोटी रुपये कर्ज देण्यात आले. त्यानंतर 55 कोटी रुपये माल तारण कर्ज देण्यात आले. त्यानंतर पुन्हा आणखी आठ कोटी रुपये कर्ज देण्यात आले. आताही पुन्हा 8196.00 लाखांच्या कर्जासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. उद्या (10 जानेवारी) होणाऱ्या सभेत या प्रस्तावावर चर्चा होईल. खासगी कारखान्याला एवढे कर्ज कसे मंजूर केले जात आहे. मधुकर सहकारी कारखान्याला थकहमी दिली जात नाही. शेतकऱ्यांनाही कर्ज दिले जात नाही. परंतु या कारखान्याला कोणत्या आधारावर कर्ज दिले जात आहे? हे सर्व कर्ज बेकादेशीर आहे. यासंदर्भात आपण मुख्यंत्री उद्धव ठाकरे व सहकारमंत्र्यांकडे आपण तक्रार दाखल करू. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com