नशिराबादला मार्चच्या आत नगरपंचायतीचा दर्जा 

नशिराबादला मार्चच्या आत नगरपंचायतीचा दर्जा 

नशिराबादला मार्चच्या आत नगरपंचायतीचा दर्जा 

नशिराबाद ः युती सरकारात मंत्री बनण्यापेक्षा तीन पक्षांच्या सरकारमध्ये मंत्री बनणे जास्त कठीण होते. नशिराबाद गावातून 910 मतांचा लीड मिळाल्याबद्दल आभार. नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर मार्च महिन्याच्या नगर पंचायतीत करणार असल्याचे आश्‍वासन पाणीपुरवठा मंत्री, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. 

राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मंत्री पाटील यांचा तर नशिराबाद-भादली गटाचे जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांची जि.प. उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल गावातील शिवसेना युवासेना तर्फे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

युवासेना, छत्रपती फाउंडेशन, विठ्ठल मंदिर ट्रस्ट, फ्रुटसेल सोसायटी, लेवा संस्था, माळी समाज पंच, कोळी समाज पंच मंडळ, भोई समाज पंच मंडळ, केएसटी उर्दू स्कूल, मुस्लिम पंच कमेटी, अशा विविध संस्था-संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री पाटील यांची लाडूतुलाही करण्यात आली. 

मंत्री पाटील म्हणाले,की पंतप्रधान मोदींची योजना असलेला 'जलशक्ती प्रकल्प' राबविणार, वाघूर प्रकल्प सुरू करून पाणी प्रश्न कायमचा सोडविणार, लहान गावांना सोलर पंप देणार असून खात्याचे बजेट 500 कोटींचे असल्याने विकास कार्यासाठी निधी कमी पडणार नाही. गाव विकासात पक्षीय राजकारण करू नये काम करताना पक्ष पाहण्याऐवजी माणसाला माणूस म्हणून मदत करावी 

उपाध्यक्ष पाटील पहिल्या टर्ममध्ये उपाध्यक्ष पद मिळणे हा माझा सत्कार नसून गावाचा सत्कार आहे. स्व. वाय.जी. महाजन सरांनी शिकविलेल्या मार्गावर चालून युती धर्म निभावला आणि कार्य केले. शेळगाव पाणी पुरवठा योजनेचे गावाला लागणारे वीजबिल 72 लाख असून पाणीपट्टी वसुली 15 लाखांच्या आत असल्याने वाघूर योजना सुरू करावी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com