अवैध वाहतुकीला लगाम घाला...; पोलिस अधीक्षक डॉ. उगले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

अपघाताच्या वाढत्या संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी बेशिस्त वाहतूकदार, अवजड वाहने, अवैध वाहतुकीला आळा घालण्याबाबत आदेश देण्यात आले. 

जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आज जिल्ह्यातील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अपघाताच्या वाढत्या संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी बेशिस्त वाहतूकदार, अवजड वाहने, अवैध वाहतुकीला आळा घालण्याबाबत आदेश देण्यात आले. 

जिल्ह्यातील वाढत्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसदलातर्फे सुरू असलेल्या कारवाईचा विरोध करून कर्मचाऱ्यांवर दबाब आणण्याचा प्रयत्न होत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. उगले यांनी आज जिल्ह्यात विविध उपविभागात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. अवजड वाहने, अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून, गोंधळ घालून दबाव आणणाऱ्यांवर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले. 

हेपण पहा : व्हॅलेंटाईनची चॉकलेट घेवून गेली तुरूंगात 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news sp dr.panjabraov ugle order by illegal traffic stop