आजी-आजोबांच्या उबदार नात्यात मायेची दृढता 

आजी-आजोबांच्या उबदार नात्यात मायेची दृढता 

जळगाव  : नातवंडं आजी- आजोबांसोबत एकत्र भोजन करतात... एकमेकांना मायेने घास भरवतात.. गाणी म्हणतात.. कविता सादर करतात.. विशेष म्हणजे एखाद्या गीतावर आजीसमवेत ठेकाही धरतात.. असे चित्र एखाद्या शाळेत पाहिलं तर..! जग खेडं बनविणाऱ्या मोबाईलच्या या दुनियेत कुटुंब व्यवस्थेनं आजी- आजोबांना दूर केलेलं असताना हे चित्र निश्‍चितच प्रेरणादायी ठरावं.. उज्ज्वल एज्युकेशन ट्रस्ट गेल्या 17 वर्षांपासून हा उपक्रम राबवितेय आणि आजी-आजोबा व नातवंडांच्या नात्यातील वीण घट्ट करण्याचा संदेशही देतंय.. आणि तेदेखील जग साजरा करीत असलेल्या प्रेमाच्या अर्थात "व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी. 

आजी-आजोबांपासून ते नातवंडापर्यंत असलेले उबदार नाते तीन पिढ्यांच्या घट्ट बंधनात घर टिकवून असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात विशेषत: आई-बाबा दोघेही नोकरी करत असताना आजी-आजोबांसाठी त्यांना वेळ मिळतो का, हा प्रश्न आहे. त्यामुळे नातवंडांना शाळेतून आणण्या-नेण्यापलीकडे त्यांचा सहवास लाभतो. ज्या घरी आजी-आजोबा नसतील तेथे काय, हादेखील प्रश्न आहे. या उबदार नात्याला अधिक दृढता देण्यासाठी उज्ज्वल एज्युकेशन ट्रस्टतर्फे 17 वर्षांपासून आजी-आजोबा कृतज्ञता दिवसाचे आयोजन करण्यात येते. 

आर्वजून पहा :पालकमंत्र्यांचा तरुणांना अजब सल्ला.. म्हणाले, परमिट रुम ...

आजी-आजोबा म्हणजे संस्काराचे विद्यापीठ 
बटव्यातून गुपचूप खडीसाखर तळहातावर ठेवणारी आजी घराघरातून हरवत चालली असून मुलांना नात्यांची ओळख करून देणारे आजी-आजोबा कुटुंबात राहिले नाहीत. आजी-आजोबा हे संस्काराचे विद्यापीठ आहे. मात्र हे विद्यापीठाचे रितेपण समाजाला घातक आहे. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी ठरत आहे. उपक्रमाच्या यशात संस्थापक अध्यक्षा अनघा गगडाणी, मानसी गगडाणी- भदादे, कामिनी धांडे, सुनयना चोरडिया, मनीषा ढाके यांच्यासह उज्ज्वल परिवारातील प्रत्येक सदस्याचा समान वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरायचे नाही. 

आजी-आजोबा म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ; पण ही व्यवस्थाच दुर्मिळ होत चालली आहे. आधुनिकतेचा आव आणणाऱ्या जगात आजी- आजोबांची जागा वृद्धाश्रमात झाली आहे. त्यामुळे कुटुंबव्यवस्थाच ढासळू लागली आहे. संस्काराची जपवणूक व्हावी आणि आजी-आजोबा नातवंडे यांच्या नात्यातील ओलावा जोपासला जावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतोय. 
- अनघा गगडाणी 
संस्थापक अध्यक्षा, उज्ज्वल एज्युकेशन ट्रस्ट. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com