उद्धव ठाकरेंना खोटं ठरवणं, आम्ही सहन करणार नाही! : गुलाबराव पाटील  

gulabrao-patil
gulabrao-patil

जळगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. त्यांची खोली हे आमच्या शिवसैनिकांचे मंदिर आहे. त्याठिकाणी झालेल्या चर्चेत आश्‍वासन देऊन आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जर कोणी खोटं ठरवीत असेल तर आम्ही आमदारही ते सहन करणार नाही. त्यामुळे आम्ही एका ओळीत सरकार स्थापनेचे अधिकार त्यांना दिले आहेत. ते राज्यातील शेतकरी आणि जनतेच्या हिताचाच योग्य निर्णय घेतील, याची आम्हाला खात्री आहे, असा विश्‍वास शिवसेनेचे उपनेते व माजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. 

राज्यात सत्तेचा तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची "महाशिवआघाडी' राज्यात सत्तेवर येण्याचे संकेत आहेत. त्या दृष्टीने चर्चाही सुरू आहे. याबाबत शिवसेनेचे उपनेते व राज्याचे माजी सहकारमंत्री व जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्याशी "सकाळ'ने संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्यात सरकार स्थापनेचा निर्णय घेण्याबाबत शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एका ओळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधिकार दिलेले आहेत. ते योग्य निर्णय घेतील. सद्य:स्थितीत झालेल्या तिढ्याबाबत ते म्हणाले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत भाजपचे नेते व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यांची ती खोली नव्हे आमच्यासाठी मंदिर आहे. त्या चर्चेत जे ठरलं त्यानुसारच उद्धव ठाकरे यांनी मागितलं. परंतु ते मान्य न करता, उद्धव ठाकरे यांनाच खोटं ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शब्दाला जागणारे आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही सर्व आमदारही ते कस सहन करू. आम्ही सर्व आमदारांनी एकमुखाने सरकार स्थापनेबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अधिकार दिले आहेत. राज्यात "महाशिवआघाडी'ची सत्ता येण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन राज्यात एक चांगले सरकार येईल, याचा आपल्याला विश्‍वास आहे. 


सिंचन प्रकल्पांकडे लक्ष 
नवीन सरकारच्या काळात जिल्ह्यात सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याकडेच आमचे लक्ष राहणार आहे. जिल्ह्यातील हे प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचनाचा "बॅकलॉग' पूर्ण होऊन विकास होईल हे निश्‍चित. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com