Jalgaon MIDC

Jalgaon MIDC

sakal 

Jalgaon News : जळगाव तालुक्यात नवीन 'एमआयडीसी'चा मार्ग मोकळा! योग्य मोबदला मिळाल्याशिवाय प्रक्रिया पुढे जाणार नाही; पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांची मोजणीस संमती

Government-Farmers Meeting on New MIDC : जळगाव तालुक्यात पिंपळे, चिंचोली व कुसुंबे येथे नवीन एमआयडीसी उभारणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मोजणीस संमती दर्शविली.
Published on

जळगाव: तालुक्यात नवीन ‘एमआयडीसी’ उभारणीसाठी जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी सकारात्मक संमती दर्शविली आहे. विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्कांशी तडजोड होऊ देणार नाही. जमिनीच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याला योग्य, समाधानकारक व कायदेशीर भरपाई मिळाल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया पुढे जाणार नाही, असा ठाम विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com