भाजप नगरसेवकांमुळेच अडली २५ कोटींची कामे - ललित कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

जळगाव - शहरातील विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटींच्या निधीतून ज्या-ज्या भागांमध्ये विकासकामे अपेक्षित आहेत, त्या-त्या भागांचा विचार करून कामे निश्‍चित केली आहेत. परंतु भाजपचे नगरसेवक निरर्थक तक्रारी करून विकासकामांत खोळंबा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप महापौर ललित कोल्हे यांनी केला आहे. 

शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटीचा निधी दिला आहे. या निधीतून कामे करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी वाढीव भागात रस्ते, गटारी, लाइट लावण्याबाबत सूचना मांडली होती. त्यांच्या सूचनेवरूनच विकास कामांची यादी निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार गटारींसाठी १० कोटी आणि पुलासाठी ३ कोटी निश्‍चित 

जनतेच्या सुविधांनुसार कामे 
केवळ शहराचा विकास आणि निधीचा योग्य विनियोग हा विचार ठेवून कामे घेतली आहेत. पण भाजप नगरसेवकांच्या वॉर्डात कामे घेतली नाहीत, असा आरोप आणि तक्रारी निरर्थक असल्याचे महापौर कोल्हे यांनी सांगितले.

विकासकामे करताना भाजप नगरसेवक कामात खोळंबा घालण्याचा प्रकार करत असल्याचा आरोप करत त्यांनी विकासकामे करताना कोणत्या पक्षाचा नगरसेवक आहे, याचा विचार न करता जनतेचा मूलभूत सुविधांचा विचार करून कामांची यादी निश्‍चित केली असल्याचेही महापौर कोल्हे यांनी म्हटले आहे.

Web Title: jalgaon news 25 crore rupees work pending by bjp corporator